भारताच्या महिला क्रिकेटर्सचा T-20 वर्ल्डकपआधी जोरदार भांगडा

भारताच्या महिला क्रिकेटर्सचा T-20 वर्ल्डकपआधी जोरदार भांगडा

भारताच्या महिला क्रिकेटर्स

आयसीसी महिला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ९ नोव्हेंबर पासून वेस्ट इंडिजमध्ये सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ रवाना झाला आहे. आयसीसीच्यातर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भारतीय महिला खेळाडूंनी भांगडा नृत्य करत आम्ही वर्ल्ड कपसाठी पुर्णपणे तयार असल्याचे दाखवून दिले. आयसीसी वर्ल्ड टी ट्वेंटीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर भारतीय महिला खेळांडूनी केलेल्या मस्तीचे धम्माल फोटो शेअर करण्यात आले आहेत. भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्थी, जेमिया रॉड्रीग्ज या फोटोमध्ये भांगडा करताना दिसत आहेत. टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा दबाव सर्वच संघावर दिसत आहे. मात्र भारताचा संघ आमच्यावर कोणताही दबाव नसल्याचे सांगत बिनधास्त भांगडा करत आहे.

सध्या टी – ट्वेंटीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. २०१६ साली भारतात झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला उंपात्य फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यावेळी मागचे अपयश पुसून टाकत विजयश्री मिळवण्यासाठी भारताच्या रणरागिणी सज्ज झाल्या आहेत.

महिला वर्ल्डकपसाठी भारताचा संघ 

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), मिताली राज, जेमिया रॉड्रीग्ज, वेदा कृष्णमुर्ती, दिप्ती शर्मा, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), पुनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्त, हेमलता, मानसी जोशी, पुजा वस्त्राकर आणि अरुंधती रेड्डी

भारतीय महिला संघासमवेत इतरही संघ कॅरेबियन बेटांवर दाखल झाली आहेत. न्युझीलँडच्या संघानेही आपल्या हटके अंदाजात आपणही कुणापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

तर गतविजेता विंडीजचा संघही भलताच आनंदात आहे. यावेळी पहिल्यांदाच महिला वर्ल्डकपचे आयोजन कॅरेबियन बेटांवर केलेले आहे. त्यामुळे विंडीजच्या संघातील मेलिस्सा हीने आपले नृत्यकौशल्या दाखवत आपला आनंद व्यक्त केला.

 

 

First Published on: November 4, 2018 8:59 PM
Exit mobile version