भारताचा मालिका विजय

भारताचा मालिका विजय

जेमिमा रॉड्रिग्स (सौ-ICC)

युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सचे अर्धशतक आणि अनुजा पाटीलच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर चौथ्या टी-२० सामन्यात ७ विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अजेय आघाडी मिळवली आहे.

प्रथम फलंदाजीत श्रीलंकेच्या १३४ धावा

चौथ्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चमारी जायांगनी (३१) आणि शशिकला श्रीवर्धने (४०) यांच्या खेळींच्या जोरावर श्रीलंकेने २० षटकांत ५ बाद १३४ धावा केल्या. भारताकडून अनुजा पाटीलने ३ विकेट घेतल्या.

जेमिमा रॉड्रिग्स आणि अनुजा पाटील यांची अर्धशतके

१३५ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था ३ बाद ४१ अशी होती. यानंतर जेमिमा रॉड्रिग्स आणि अनुजा पाटील यांनी नाबाद ९६ धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. जेमिमा रॉड्रिग्सने या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. तिने ३७ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. तर अनुजा पाटीलने ४२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. त्यामुळे भारताने या मालिकेत ४ सामन्यांनंतर ३-० अशी आघाडी मिळवली आहे.
First Published on: September 24, 2018 6:52 PM
Exit mobile version