भारताचे दिग्गज फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी काळाच्या पडद्याआड

भारताचे दिग्गज फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी काळाच्या पडद्याआड

भारताचे दिग्गज फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी काळाच्या पडद्याआड

भारताचे दिग्गज फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे आज वयाच्या वयाच्या ८३ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बॅनर्जी यांच्या पश्चात नामांकित शिक्षणतज्ज्ञ असलेल्या कन्या पौला आणि पूर्णा आणि पी. के. बॅनर्जी यांचा लहान भाऊ प्रसून बॅनर्जी जे तृणमूल काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत. पी. के. बॅनर्जी हे १९६२ च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे सदस्य होते. भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगातील यशस्वी स्ट्रायकर म्हणून पी. के. कुमार यांची ओळख होती.

गेले काही दिवस पी. के. .बॅनर्जींना न्यूमोनियामुळे श्वसनाचा त्रास होत होता. यासह त्यांना पार्किन्सन रोग, स्मृतिभ्रंश आणि हृदयाच्या आजाराने ग्रासले होते. पी. के. बॅनर्जी हे गेल्या २ मार्चपासून लाईफ सपोर्टरवर होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२. ४० वाजता त्यांचा मृत्यू झाला.


हेही वाचा – Coronavirus: पहिली ते आठवीची परिक्षा रद्द

पी. के. बॅनर्जी यांचा जन्म २३ जून १९३६ रोजी पश्चिम बंगाल येथील जलपैगूरी येथे झाला. ८४ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. ८४ सामन्यांमध्ये त्यांनी ६५ गोल केले आहेत.पी. के. बॅनर्जी यांनी रोममध्ये पार पडलेल्या १९६०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे
नेतृत्व केले होते. यावेळी बॅनर्जी यांच्या गोलच्या जोरावर भाराताने बलाढ्या फ्रान्सला १-१ असे बरोबरीत रोखले. याशिवाय बॅनर्जी यांनी १९५६ च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४-२ असा विजय मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पी. के. बॅनर्जी यांचे भारतीय फुटबॉलमधील योगदानाबद्दल जागतिक फुटबॉल संघटनेने (FIFA) त्यांचा २००४ साली गौरव केला.

 

First Published on: March 20, 2020 4:28 PM
Exit mobile version