आयसीसी क्रमवारीत कर्णधार हरमनप्रीत कौर टॉप-5 मध्ये

आयसीसी क्रमवारीत कर्णधार हरमनप्रीत कौर टॉप-5 मध्ये

आयसीसीची वनडे क्रमवारी नुकताच जाहीर करण्यात आली आहे. आयसीसीच्या या क्रमवारीत फलंदाजाच्या यादीत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मोठा फायदा झाला आहे. हरमनप्रीत कौर पाचव्या स्थानी पोहोचली आहे. याशिवाय महिला संघाची सलामीवीर स्मृती मांधाना आणि दीप्ती शर्मालाही फायदा झाला आहे. (indian women team captain harmanpreet kaur fifth place in icc odi rankings)

कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 143 धावांची धामकेदार खेळी केली होती. आयसीसीच्या ताज्या क्रमावारीनुसार, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्माच्या क्रमावारीत एका क्रमाने सुधारणा झाली आहे. स्मृती मानधना सहाव्या तर, दिप्ती शर्मा 24 व्या स्थानावर पोहचली आहे. इंग्लंडच्या चार्ली डीनने मंकडिंग आऊट केल्यानंतर दीप्ती शर्मा चर्चेत आली आहे.

गोलंदाज पूजा वस्त्राकरलाही 4 स्थानांचा फायदा झाला आहे. तिने 53 व्या स्थानावर 49 व्या स्थानावर झेप घेतलीय. तर, हरलीन देओलने 46 क्रमांची मोठी झेप घेत 81 व्या स्थानावर पोहचली आहे. इंग्लंडची डॅनी व्हॅट 21 व्या क्रमांकावर आहे. तसेच, एमी जोन्स 30 व्या क्रमांकावर पोहचलीय. चार्ली डीननंही 62 व्या स्थानावर झेप घेतलीय.

येत्या 1 ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि थायलंड यांच्यात 1 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. तर, 15 ऑक्टोबरला या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

महिला आशिया चषकासाठी भारतीय संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबिनेनी मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, यादव, के.पी.नवगिरे.

राखीव खेळाडू – तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर.


हेही वाचा – मुंबईत 1 ऑक्टोबरपासून रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ होणार

First Published on: September 27, 2022 6:41 PM
Exit mobile version