INDvsBAN: जाणून घ्या; कसोटी मालिकेतील गुलाबी बॉलचे सीक्रेट्स

INDvsBAN: जाणून घ्या; कसोटी मालिकेतील गुलाबी बॉलचे सीक्रेट्स

गुलाबी बॉलचे सीक्रेट्स

भारत आणि बांगलादेश यांच्यात एक कसोटी मालिका होणार आहे, ज्याची पहिली कसोटी भारताच्या नावावर आहे. या मालिकेचा दुसरा सामना आता ईडन गार्डन्स कोलकाता येथे होणार असून सगळ्यांच्या नजरा या कसोटीवर आहे. कारण आज २२ नोव्हेंबरला भारतीय क्रिकेटचा इतिहास बदलला जाणार आहे. यादरम्यान भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या डे-नाईट कसोटीची सुरुवात आजपासून गुलाबी बॉलचा वापर करून कोलकाता येथे होणार आहे. गुलाबी बॉलने खेळली जाणारी भारताची पहिली कसोटी असून या कसोटीसाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता तेवढीच राहणार आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली दिवस-रात्र कसोटी २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत कोलकाता येथे दिसणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या सामान्यात गुलाबी बॉलचा वापर करून हा सामना खेळला जाणार आहे. डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये खरं तर भारताच्या दृष्टीकोनातून सर्वात मोठे आव्हान दुसरे काही नसून हा गुलाबी बॉल असणार आहे.

असं आहे गुलाबी बॉलचं स्वरूप

एसजी कंपनी कडून तयार करण्यात आलेला हा गुलाबी १५६ ग्रॅम वजनाचा असून त्याचा घेर २२ .५ सेमी असा आहे. या बॉलला तीन प्रकारचे टाके घालण्यात आले आहे. त्यात एक म्हणजे लिप स्टिच आणि बॉलच्या दोन्ही भागाला साधारण ७८ टाके घालण्यात आले आहे. दोन्ही बाजूला असणाऱ्या टाक्यांमुळे या बॉलची पकड करण्यात गोलंदाजांना उपयुक्त ठरणार आहे. १९५० पासून एस.जी. कंपनी उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये बॉलची निर्मिती करत आहेत.

अशी आहे बॉल तयार होण्याची प्रक्रिया

एसजी कंपनी कडून या सामन्यासाठी १०० हून अधिक गुलाबी बॉल बनविण्यात आले असून यापूर्वी वापरण्यात येणाऱ्या लाल बॉलपेक्षा हा गुलाबी बॉल खूपच वेगळा आहे. हा गुलाबी बॉल तयार होण्यास आठ दिवस लागतात तर लाल बॉल हा फक्त तीन दिवसांत तयार होत होता. लाल रंगाच्या बॉलसाठी वापर करण्यात येणारं लेदर रंगवण्याची प्रक्रिया सोपी होती मात्र गुलाबी रंगाचा बॉल गुलाबी रंगाच्या अनेक लेअऱने तयार करण्यात वेळ लागतो. या नव्या बॉलची समस्य़ा म्हणजे त्याचा रंग आणि आकार वेगळा असल्याने त्याता वापर कठीण होऊन, स्विंग करणं सोपं तर रिव्हर्स स्विंग करतानाही समस्या होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापुर्वीही केला होता या बॉलचा वापर

२००९ मध्ये एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा गुलाबी रंगाच्या बॉलचा वापर करण्यात आला होता. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या महिला संघांदरम्यान झाला होता. यानंतर पुरूष संघात या बॉलचा वापर आता करण्यात येणार आहे.

First Published on: November 22, 2019 2:37 PM
Exit mobile version