INDW Vs AUSW : शेवटच्या षटकातील ‘नो बॉल’ वरुन वाद, पंचाच्या निर्णयाचे सोशल मीडियावर ट्रोलिंग

INDW Vs AUSW :  शेवटच्या षटकातील ‘नो बॉल’ वरुन वाद, पंचाच्या निर्णयाचे सोशल मीडियावर ट्रोलिंग

भारतीय महिला क्रिकेट टीम शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पराभूत झाली आहे. विजयाच्या उंबरठ्यावर असताना भारताचा पराभव एका नो बॉलमुळे झाला आहे. शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर नो बॉल दिल्यामुळे सामना पलटला. तीनच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-० ने आघाडी मिळवली आहे. परंतु पंचांनी दिलेल्या नो बॉलची सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. पंचांनी दिलेला निर्णय हा चुकीचा असल्याचे नेटकऱ्यांचे मत आहे.

अंतिम षटकातील शेवटच्या चेंडूवर काय झाले होते? ऑस्ट्रेलियाच्या संघाला शेवटच्या चेंडूमध्ये ३ धावांची गरज होती. भारताची स्टार गोलंदाज झूलन गोस्वामी गोलंदाजी करत होती. झूलनच्या शेवटचा चेंडू फेकल्यावर ऑस्ट्रेलियाची खेळाडू मूनी चेंडू टोलवण्याच्या नादात बाद झाली आणि भारतीय संघात विजयचे वातावरण तयार झाले. तेवढ्यात पंचांनी शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचे घोषित केले. या चेंडूवर थर्ड अंपायरची मदत घेण्यात आली अखेर हा चेंडू नो बॉल म्हणून घोषित करण्यात आला. यामुळे ऑस्ट्रेलियाला एक फ्रि हिट मिळाली आणि शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने २ धावा काढून विजय आपल्या नावे केला.

चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

शेवटच्या चेंडूवर नो बॉल दिल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, पंचांनी योग्य चेंडूला नो बॉल दिलाय. ऑस्ट्रेलिया क्रिकेटर लिसाने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून नो बॉल कोणत्या आधारावर देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच एका नेटकऱ्याने म्हटलंय की, जर हा पुरुष संघाचा सामना असता तर पंचांनी असा निर्णय दिला नसता. पंच विराट कोहलीच्या उपस्थितीमध्ये असा निर्णय देऊ शकत नाही. भारतीय चाहते हा सामना विजयी घोषित करण्याची वाट पाहत आहेत.

दुसऱ्या वनडेमध्ये भारताने फलंदाजी करत २७४ धावा काढल्या करुन २७५ धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलिया टीम पहिल्या २५ षटकांमध्ये दबावात होती परंतु मूनीच्या १३३ चेंडूंमध्ये १२५ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आहे.

First Published on: September 25, 2021 5:38 PM
Exit mobile version