IPL 2020: मॅच सुरू होण्याआधी रोहित शर्माने हा फोटो केला शेअर आणि म्हणाला

IPL 2020: मॅच सुरू होण्याआधी रोहित शर्माने हा फोटो केला शेअर आणि म्हणाला

अखेर बहुचर्चित, बहुप्रतेक्षीत IPL चे सामने सुरू होत आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) च्या १३ व्या हंगामाला प्रारंभ होत आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. अबू धाबीच्या स्टेडिअममध्ये हा सामना होईल. या सामन्यात सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस.धोनीच्या कामगिरीकडे असणार आहे.

यंदाच्या आयपीएलबद्दल प्रेक्षकांइतकीच उत्सुकता खेळाडूंमध्ये आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इन्स्टाग्रामवरून शेअर केली आहे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत एक कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये ‘तयारी पूर्ण झाली, आता अमलबजावणीची वेळ’ असे रोहितने म्हटले आहे.

आयपीएलच्या तेराव्या मोसमाला आजपासून सुरुवात होत असून सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ यंदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी दावेदार मानले जात आहेत. मात्र, सलामीचा सामना कसा होऊ शकेल, कोण जिंकू शकेल याबाबत केलेली चर्चा. मागच्यावर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जवर एका धावेने विजय मिळवला होता.

First Published on: September 19, 2020 11:48 AM
Exit mobile version