IPL 2021 : यंदा पुन्हा आयपीएलमध्ये खेळणे अवघड; स्टोक्सने केले स्पष्ट

IPL 2021 : यंदा पुन्हा आयपीएलमध्ये खेळणे अवघड; स्टोक्सने केले स्पष्ट

यंदा पुन्हा आयपीएलमध्ये खेळणे अवघड; बेन स्टोक्सने केले स्पष्ट 

कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. परंतु, यंदाचा मोसम स्थगित झालेला असून रद्द झालेला नाही, असे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले होते. उर्वरित मोसम कधी आणि कुठे होणार, हे अजून स्पष्ट नाही. परंतु, याच वर्षी पुन्हा आयपीएल झाल्यास त्यात इंग्लंडचे खेळाडू सहभागी होणार नाहीत, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) डायरेक्टर ऑफ क्रिकेटअ‍ॅशली जाईल्स यांनी सांगितले होते. आता इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सनेही यंदा पुन्हा आयपीएलमध्ये खेळू शकणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

९ ते १० आठवडे मैदानाबाहेर

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या स्टोक्सला यंदा आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दुखापत झाली. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाला. त्यामुळे त्याला उर्वरित मोसमातून माघार भाग पडले. या दुखापतीमुळे त्याला आता साधारण ९ ते १० आठवडे मैदानाबाहेर रहावे लागणार आहे. परंतु, त्यानंतर आयपीएलचा उर्वरित मोसम झाला, तरीही त्यात आपण खेळू शकणार नाही, असे स्टोक्सचे म्हणणे आहे.

पूर्ण मोसम खेळण्यास उत्सुक

यंदा पुन्हा आयपीएल होऊ शकेल का, हे सांगणे अवघड आहे. मात्र, इंग्लंड संघाचे व्यस्त वेळापत्रक आहे. त्यातून आम्हाला वेळ काढणे शक्य होणार नाही हे ईसीबीनेसुद्धा स्पष्ट केले आहे. यंदा मला पहिल्याच सामन्यात दुखापत झाली. परंतु, भविष्यात मी आयपीएलचा पूर्ण मोसम खेळण्यास उत्सुक असल्याचे स्टोक्स म्हणाला.

First Published on: May 12, 2021 11:07 PM
Exit mobile version