IPL 2021 : मुंबई इंडियन्सची फलंदाजी; हैदराबादच्या संघात चार बदल

IPL 2021 : मुंबई इंडियन्सची फलंदाजी; हैदराबादच्या संघात चार बदल

डेविड वॉर्नर आणि रोहित शर्मा 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये सामना होत आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईला यंदाच्या मोसमातील सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन करत कोलकाता नाईट रायडर्सवर मात करत यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवला होता. मात्र, आजच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आला असून मार्को जेन्सनच्या जागी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिलनेला संधी देण्यात आली आहे.

वृद्धिमान साहाला वगळले 

दुसरीकडे यंदाच्या मोसमातील आपले पहिले दोन्ही सामने गमावणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने आजच्या सामन्यासाठी संघात तब्बल चार बदल केले आहेत. विराट सिंह, अभिषेक शर्मा, मुजीब उर रहमान आणि खलील अहमद यांना संघात स्थान देण्यात आले आहे. वृद्धिमान साहाला संघातून वगळण्यात आले असून जॉनी बेअरस्टो यष्टिरक्षण करणार आहे. तसेच बेअरस्टो कर्णधार डेविड वॉर्नरच्या साथीने सलामीला येण्याची शक्यता आहे.

First Published on: April 17, 2021 7:13 PM
Exit mobile version