IPL 2022 Date and Venue: महाराष्ट्रातील दोन शहरांत होणार IPL सामने, कधी होणार आयपीएलची सुरुवात?

IPL 2022 Date and Venue: महाराष्ट्रातील दोन शहरांत होणार IPL सामने, कधी होणार आयपीएलची सुरुवात?

IPL Auction 2022 : IPL खेळाडूंचे उद्यापासून मेगा ऑक्शन, कोणाला संधी?, वेळेसह खर्चाचीही माहिती

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १५ व्या हंगामावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आयपीएलच्याबाबत गंभीर आहे. बोर्डाने शनिवारी आयपीएल फ्रेंचायझींसोबत बैठक व्हर्च्युअल बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांत आयपीएलचे सर्व सामने आयोजित करण्यावर सहमती झाली आहे. मुंबई आणि पुण्यात सर्व सामने आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामाची सुरुवाती मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझींच्या बैठकीमध्ये कोरोना परिस्थिती आणि आयपीएलच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. आयपीएलची सुरुवात २७ मार्च रविवारपासून होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच बीसीसीआय मालिकांचे आयोजन महाराष्ट्रात करण्यावर भर देत आहे. तसेच पहिला सामना मुंबईत होण्याची शक्यता आहे. भारतात आयपीएलचे सामने आयोजित करण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न सुरु आहेत.

आयपीएलचे सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांत करण्याबाबत बीसीसीआयची आग्रही भूमिका आहे. या दोन शहरांत ४ मैदाने जवळ-जवळ असल्यामुळे आयोजन करण्यात अधिक सोयीचे होईल. मुंबईत वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (ब्रेबोर्न स्टेडियम) आणि डीवाय पाटील स्टेडियम तसेच पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियममध्ये सामने होऊ शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियमध्ये जाण्यास परवानगी नाही आहे. मुंबई आणि पुण्यात सामने झाल्यास खेळाडूंना विमानतळावर जाण्याची आवश्यकात भासणार नाही. खेळाडू बसने यात्रा करु शकतात. यामुळे लोकांशी संपर्क येणार नाही.

कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास पुन्हा एकदा आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये करण्यात येऊ शकते. दक्षिण आफ्रिकेत सामन्यांचे आयोजन करण्यास बोर्ड तयार नाही. यूएईमध्ये दोन हंगाम आयोजित करण्यात आले असल्यामुळे बोर्डाला सोयीचं होईल. श्रीलंकेचं नाव चर्चेत होते परंतु बैठकीत श्रीलंकाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.

आयपीएल लिलावासाठी बाराशे खेळाडूंची नोंदणी

आयपीएलकडून शनिवारी लिलावासाठी नोंदणी करणाऱ्या खेळाडूंची माहिती दिली आहे. आयपीएलचे मेगा ऑक्शन बंगळुरूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे.


हेही वाचा : IND vs SA 2nd ODI: शून्यावर उडाली विराट कोहलीची दांडी, ७१ व्या शतकाची वाढली प्रतीक्षा

First Published on: January 22, 2022 5:55 PM
Exit mobile version