घरक्रीडाIND vs SA 2nd ODI: शून्यावर उडाली विराट कोहलीची दांडी, ७१ व्या...

IND vs SA 2nd ODI: शून्यावर उडाली विराट कोहलीची दांडी, ७१ व्या शतकाची वाढली प्रतीक्षा

Subscribe

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार्लच्या Boland Park मध्ये दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. परंतु रनमशीन विराट कोहली पु्न्हा एकदा शून्यावर आऊट झाला आहे. कोहलीली दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजने त्याला आऊट केले. तसेच त्याची कॅच टेंबा बावुमाने पकडली. कोहली आऊट झाल्यामुळे आता ७१ व्या शतकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु पहिल्या १० ओव्हर्समध्ये केएल राहुलने न खेळण्याचा निर्णय घेतला होता. धवन आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी ११.४ ओव्हरमध्ये ६३ धावा काढल्या होत्या.

- Advertisement -

धवनने ३९ बॉल्समध्ये पाच चौकारच्या मदतीने २९ धावा काढत आऊट झाला. एडन मार्करमने त्याला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर तीन नंबरवर फलंदाजी करण्यासाठी विराट कोहली मैदानात उतरला. मागील सामन्यात अर्धशतक लगावणारा कोहली आज पहिल्याच बॉलमध्ये उडाला.

असे आहेत दोन्ही संघ –

टीम इंडिया

- Advertisement -

केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.

दक्षिण अफ्रीका टीम

टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, जानेमन मालन, एडन मार्कराम, रासी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लँगी एनगिडी, सिसांडा मगला आणि तबरेझ शम्सी.


हेही वाचा : रायगड जिल्ह्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -