IPL 2022 : आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला मिळालेत १० करोड रुपये, टीम्सकडे ५५० करोड उपलब्ध

IPL 2022 : आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला मिळालेत १० करोड रुपये, टीम्सकडे ५५० करोड उपलब्ध

‘फ्रि हिट’वर ‘बेटिंग’!

आयपीएल २०२२ हंगामातील खेळाडूंच्या लिलावाला आता काही दिवसांचा कालाधी बाकी राहिला आहे. मंगळवारी लखनऊ फ्रेंचायझीसंबंधित ३ खेळाडूंची नावे समोर आली आहेत. अशा प्रकारेच १० संघांसबंधित एकूण ३३ खेळाडूंची नावं समोर आली आहेत. या खेळाडूंवर ३३७ करोड रुपये खर्च करण्यात आला आहे. आशा प्रकारे एका खेळाडूवर १० करोड रुपये खर्च करण्यात आला आहे. पुढील महिन्याच्या १२ आणि १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये संघांकडे असलेला ५५० करोड रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. एक फ्रेंचायझी संघातील खेळाडूंवर ९० करोड रुपये खर्च करण्याची शक्यता आहे. यंदा टी २० लीगमध्ये ८ च्या ऐवजी १० संघ असणार आहेत.

लखनऊने केएल राहुलसह ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिस आणि युवा लेग स्पिनर रवि बिश्नोईला आपल्या संघात घेतलं आहे. राहुल संघाचा कर्णधार बनू शकतो. तर अहमदाबादने हार्दिक पंड्या व्यतिरिक्त राशिद खान आणि शुभमन गिलला संघात स्थान दिल आहे. पंड्या संघाचा कर्णधार होऊ शकतो. पंड्याला मागील दिवसांमध्ये मुंबई इंडियन्सने रिटेन केले नाही आणि केएल राहुल स्वतःच पंजाब किंग्जमधून वेगळा झाला होता.

पंजाबकडून खेळाडूंवर सर्वात कमी खर्च

पंजाब किंग्जने सगळ्यात कमी १८ करोड खर्च केला आहे. त्यांच्याकडे आताही ७२ करोड रुपये उर्वरित आहेत. तर सनराइजर्स हैदराबादने २२ करोड रुपयांचा खर्च केला असून त्यांच्या संघाकडे ६८ करोड रुपये शिल्लक आहेत. या व्यितिरिक्त चेन्नई सुपर किंग्जने ४२ करोड खर्च केले असून त्यांच्याकडे ४८ करोड शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्सने ४२.५० करोड खर्च केले ४७.५० करोड शिल्लक, केकेआरने ४२ करोड खर्च केले ४८ करोड राहिले, मुंबई इंडियन्सने ४२ करोड खर्च केले ४८ करोड राहिले तर राजस्थान रॉयल्स २८ करोजड खर्च करुन ६२ करोड शिल्लक ठेवलेत. आरसीबीने ३३ करोड खर्च केले असून ५७ करोड शिल्लक ठेवलेत. लखनऊ ३० करोड खर्च केले ६० करोड ठेवलेत आणि अहमदाबादमच्या संघाने ३७ करोड खर्च केले असून ५३ करोड रुपये शिल्लक ठेवले आहेत. अशा प्रकारे सगळ्या संघांकडे ५६३.५ करोड रुपयांचा निधी शिल्लक आहे. आतापर्यंत ३३६.५ करोड रुपये खर्च करण्यात आले आहेत.


हेही वाचा : IND vs SA, ODI Series: विराट कोहली मोडू शकतो मास्टर ब्लास्टरचा मोठा रेकॉर्ड, फक्त ९ धावांची गरज

First Published on: January 18, 2022 7:43 PM
Exit mobile version