IPL 2022: डग आऊटमध्ये बसलेल्या मुरलीधरनचे रौद्ररुप पाहिलंत का?; ‘या’ व्हायरल व्हिडीओची होतेय सर्वत्र चर्चा

IPL 2022: डग आऊटमध्ये बसलेल्या मुरलीधरनचे रौद्ररुप पाहिलंत का?; ‘या’ व्हायरल व्हिडीओची होतेय सर्वत्र चर्चा

हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेला कालचा सामना फारच रोमांचक होता. सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत सामना रंगला आणि अखेर गुजरातने तगडा विजय हैदराबादवर मिळवला. शेवटच्या षटकात 22 धावांची गरज असताना राशिद खानने वादळी खेळी करत गुजरातला जिंकवून दिलं. मात्र या सामन्यात झालेल्या गुजरातच्या पराभवामुळे संघाचा स्पिन बॉलिंग कोच मुथय्या मुरलीधरन चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळाला. त्याचा भडकण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हैदराबादने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात चांगली झाली. ऋद्धीमान साहाने 38 बॉलमध्ये 68 रन केले, तर गिलने 22 धावांची खेळी करून साहाला साथ दिली. राहुल तेवातियाने 21 चेंडूत नाबाद 40 आणि राशिद खानने 21 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. 20 व्या ओव्हरमध्ये मार्को जेनसनच्या पहिल्या बॉलला राहुल तेवातियाने सिक्स मारल्यावर दुसऱ्या बॉलला एक धाव काढत राशिद खानला स्ट्राईक दिली. यानंतर राशिदने 3 सिक्स मारून गुजरातला विजय मिळवून दिला.

हैदराबाद विरुद्धच्या या विजयासह गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. या मोसमात गुजरातने 8 पैकी 7 मॅच जिंकल्या असून फक्त एकाच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर हैदराबादची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 8 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.


हेही वाचा – मे-जूनमध्ये विजेची विक्रमी मागणी वाढणार; सरकारचा इशारा

First Published on: April 28, 2022 10:30 AM
Exit mobile version