मे-जूनमध्ये विजेची विक्रमी मागणी वाढणार; सरकारचा इशारा

देशातील औष्णिक वीज केंद्रांतील कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे वीज पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र असं असताना मे-जूनपर्यंत विजेची सध्याची मागणी १० टक्क्यांनी वाढणार असल्याचे सरकारनं म्हटलं आहे.

power crisis in the country has increased with a shortfall of 10.77 gigawatts
देशातील वीज संकट वाढलं, पुरवठ्यात 10.77 गीगावॅटचा तुटवडा

देशातील औष्णिक वीज केंद्रांतील कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे वीज पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र असं असताना मे-जूनपर्यंत विजेची सध्याची मागणी १० टक्क्यांनी वाढणार असल्याचे सरकारनं म्हटलं आहे. त्यानुसार मे-जूनमध्ये विजेची मागणी २.१५ लाख मेगावॅट ते २.२० लाख मेगावॅट दरम्यान वाढण्याची शक्यता आहे.

मंगळवारी देशातील विजेची मागणी २.०१ लाख मेगावॅट होती. ही मागणी गतवर्षी 9 जुलै रोजी नोंदवलेल्या 2.00539 लाख मेगावॅटपेक्षा अधिक आहे. मार्च २०२२ मध्ये विजेची मागणी ८.९ टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोळसा पुरवठ्याशी संबंधित अडथळे दूर करता यावेत यासाठी शासनाच्या विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यात आला आहे.

याशिवाय, विजेची वाढती मागणी लक्षात घेत संबंधित कंपनीने कोळशाचा पुरवठा वाढवला असल्याचे सरकारी मालकीच्या कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, जानेवारी २०२२ पासून विजेची मागणी ११ टक्क्यांनी वाढली आहे. याआधी देशात विजेची एवढी मागणी वाढली नव्हती.

समस्या कोळशाच्या उपलब्धतेची नसून कोळसा खाणींमधून कारखान्यांपर्यंत नेण्यासाठी सुविधांची कमतरता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून पुरेसे रेक उपलब्ध होत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे. गरज लक्षात घेता दररोज 425 रेकची अवशक्यता असताना केवळ 370 रेक उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कोल इंडियाने कारखान्यांना 17 दशलक्ष टन कोळसा उपलब्ध करून दिला होता, परंतु केवळ 40 टक्के कोळसा वाहतूक करता आला.


हेही वाचा – समान नागरी कायद्याला रामदास आठवलेंचे समर्थन; म्हणाले, संसदेत मांडल्यास सहकार्य करणार