IPL 2023 : वीरेंद्र सेहवागची पृथ्वी शॉवर सडकून टीका; म्हणाला…

IPL 2023 : वीरेंद्र सेहवागची पृथ्वी शॉवर सडकून टीका; म्हणाला…

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने युवा फलंदाज पृथ्वी शॉवर सडकून टीका केली आहे. कालच्या सामन्यात पृथ्वी शॉ ज्याप्रकारे बाद झाला त्यावरून सेहवागने शुभमन गिलचे उदाहरण देत पृथ्वी शॉला चांगलेच सुनावले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी (४ एप्रिल) त्यांच्या घरच्या मैदानावर दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला. या सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉ केवळ 7 धावा करून बाद झाला. यावर वीरेंद्र सेहवागने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना वक्तव्य केले की, पृथ्वी याआधी अनेकदा असेच शॉट्स खेळून बाद झाला आहे. त्याला त्यांच्या चुकीपासून धडा घेण्याची गरज आहे. शुभमन गिलकडे पृथ्वीसोबत अंडर-19 क्रिकेट खेळला आणि आता तो कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. मात्र पृथ्वी शॉ आजही आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे, असे सेहवाग म्हणाला.

त्याने सांगितले की, पृथ्वी शॉने आयपीएल प्लॅटफॉर्म वापरून जास्तीत जास्त धावा केल्या पाहिजेत. ऋतुराज गायकवाडने एका मोसमात ६०० हून अधिक धावा केल्या आहेत. शुभमन गिलनेही धावा केल्या. त्यामुळे अशा परिस्थितीत पृथ्वी शॉलाही आयपीएलमध्ये सातत्याने धावा करताना चांगली कामगिरी करावी लागेल.

दिल्लीचा या हंगामातील दुसरा पराभव
रिषभ पंतच्या अनुपस्थितीत सध्याच्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दिल्लीचे संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिलेली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या गुजरात टायटन्सकडून दिल्ली संघाला या हंगामातील दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यातसुद्धा दिल्ली संघाला लखनऊ सुपरजायंट्सकडून 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

ऋषभ पंत दिल्ली सामन्यासाठी पहिल्यांदाच स्टेडियममध्ये 
गेल्या वर्षी झालेल्या कार अपघातानंतर भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत पहिल्यांदाच स्टेडियममध्ये पोहोचला होता. पंतला कारमधून दोन-तीन जणांनी आधार देऊन गाडीतून बाहेर काढले आणि त्याला स्टेडियममध्ये आणण्यात आले. त्यानंतर पंत वॉकिंग स्टिकच्या मदतीने पुढे चालताना दिसला. यावेळी तो स्टँडवर बसून सामना बघताना दिसला. सामन्यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावरील हास्याने चाहत्यांची मने जिंकली. त्याला दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी पंतला चालण्या-फिरण्यासाठी मदत केली. याशिवाय बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लाही पंतला भेटायला पोहोचले.

 

First Published on: April 5, 2023 3:49 PM
Exit mobile version