IPL 2021 : आयपीएल खेळाडू लिलाव १८ फेब्रुवारीला 

IPL 2021 : आयपीएल खेळाडू लिलाव १८ फेब्रुवारीला 

आयपीएल खेळाडू लिलाव

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या पुढील मोसमाआधीचा खेळाडू लिलाव (Auction) १८ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. ‘आयपीएल खेळाडू लिलाव १८ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र, ठिकाण अजून निश्चित झालेले नाही,’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. बुधवारी आयपीएलमधील आठही संघांनी काही खेळाडूंना रिटेन केले आणि काही खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला. ज्या खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले आहे, त्यांच्यासाठी लिलाव खूप महत्वाचा असेल. तसेच काही नव्या खेळाडूंनाही आपल्या संघात घेण्यासाठी आठही फ्रेंचायझी उत्सुक असतील.

आगामी मोसम भारतात?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मागील वर्षी आयपीएल स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये पार पडली. यंदा मात्र आयपीएल स्पर्धा कुठे आणि कधी होणार, हे निश्चित करण्यात आलेले नाही. यंदाचे आयपीएल भारतातच व्हावे यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले होते. पुढील महिन्यापासून इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. हा दौरा सुरळीत पार पडल्यास आयपीएल स्पर्धा भारतात होऊ शकेल.

‘या’ तिघांवर मोठी बोली? 

खेळाडूंना रिटेन करण्यासाठी आठही संघांना २० जानेवारीपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ग्लेन मॅक्सवेल आणि शेल्डन कॉट्रेल यांना, तर राजस्थान रॉयल्सने स्टिव्ह स्मिथला संघाबाहेर केले होते. त्यामुळे या तिघांना खेळाडू लिलावात मोठी बोली लागू शकेल.


हेही वाचा – ‘हे’ दोन संघ संजू सॅमसनला खरेदी करण्यास होते उत्सुक!


 

First Published on: January 22, 2021 10:09 PM
Exit mobile version