घरक्रीडाIPL 2021 : 'हे' दोन संघ संजू सॅमसनला खरेदी करण्यास होते उत्सुक!

IPL 2021 : ‘हे’ दोन संघ संजू सॅमसनला खरेदी करण्यास होते उत्सुक!

Subscribe

राजस्थानने नुकतीच संजू सॅमसनची कर्णधारपदी निवड केली.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी मोसमापूर्वी आठही संघांनी काही खेळाडूंना ‘रिटेन’ केले आणि काही खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला. राजस्थान रॉयल्स संघाने मागील वर्षी कर्णधारपद भूषवणाऱ्या स्टिव्ह स्मिथला पुन्हा करारबद्ध करणे टाळले. त्यांनी स्मिथला संघाबाहेर करत भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनची कर्णधारपदी निवड केली. मात्र, सॅमसनला आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याला छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे राजस्थानच्या या निर्णयावर काही क्रिकेट समीक्षक प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते राजस्थानकडे सॅमसनला कर्णधार बनवण्यावाचून पर्याय नव्हता. कारण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे संघ त्याला खरेदी करण्यास उत्सुक होते.

कर्णधार बनवावेच लागले

दोन संघसंजू सॅमसनला खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती मला मिळाली आहे. हे दोन संघ होते, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स. आरसीबी आणि सीएसकेने सॅमसनला खरेदी करण्याची ईच्छा दाखवल्यावर राजस्थानकडे सॅमसनला कर्णधार बनवण्यावाचून पर्याय नव्हता. त्याला अधिकार देणे राजस्थानच्या व्यवस्थापनाला भाग पडले, असे आकाश चोप्रा म्हणाला.

- Advertisement -

स्मिथला संघाबाहेर करणे योग्यच 

तसेच स्मिथला संघातून बाहेर करण्याविषयी चोप्राने सांगितले, परदेशी खेळाडूला कर्णधार बनवणे मला आवडत नाही. प्रत्येक संघाला एका सामन्यात केवळ चारच परदेशी खेळाडू खेळवता येतात. तुम्ही परदेशी खेळाडूची कर्णधारपदी निवड केल्यास तुमच्याकडे इतर तीन जागाच शिल्लक राहतात. स्मिथला संघाबाहेर करण्याचा राजस्थानचा निर्णय योग्यच होता. त्याच्यासाठी राजस्थानला १२.५ कोटी रुपये मोजावे लागत होते. त्याला इतकी मोठी रक्कम देणे योग्य नाही.


हेही वाचा – रॉबिन उथप्पा खेळणार आता ‘या’ संघाकडून 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -