वर्ल्ड चॅम्पियन होऊन भारतीय संघाला १२ वर्षे पूर्ण, ICCने व्हिडीओ शेअर करत दिली खास भेट

वर्ल्ड चॅम्पियन होऊन भारतीय संघाला १२ वर्षे पूर्ण, ICCने व्हिडीओ शेअर करत दिली खास भेट

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीच्या ऐतिहासिक षट्काराने भारतीय संघाला २८ वर्षानंतर विश्वविजेता बनवलं. आज भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन होऊन १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आज आयसीसीने दिवस साजरा केला आहे. तसेच यासंदर्भातील व्हिडीओ देखील ICCने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यंदाच्या वर्षातही विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळणार आहे. या विश्वचषकाचा खास आणि नवीन लोगोही आयसीसीकडून लॉन्च करण्यात आला आहे. ICC ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये खेळाबाबत चाहत्यांच्या भावना दाखवण्यात आल्या आहेत.

ही स्पर्धा सुरू होण्यास अजून ६ महिने बाकी आहेत. याआधी हा विश्वचषक नवरस वापरून विकसित करण्यात आला आहे. विश्वचषक २०२३ नवरसमध्ये आनंद, सन्मान, अभिमान, जिद्द अशा अनेक प्रकारच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकपबाबत मोठे विधान केले आहे. वर्ल्ड कपला अजून ६ महिने बाकी आहेत आणि जल्लोष सुरू झाला आहे. घराच्या मैदानावर विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. तसेच एक कर्णधार म्हणून तो अजिबात वाट पाहू शकत नाही, असं रोहित शर्मा म्हणाला.


हेही वाचा : सिक्सर किंग सलीम दुर्राणींचे निधन; क्रिकेटसोबतच Actor म्हणून प्रसिद्ध


 

First Published on: April 2, 2023 5:08 PM
Exit mobile version