Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा सिक्सर किंग सलीम दुर्राणींचे निधन; क्रिकेटसोबतच Actor म्हणून प्रसिद्ध

सिक्सर किंग सलीम दुर्राणींचे निधन; क्रिकेटसोबतच Actor म्हणून प्रसिद्ध

Subscribe

 

नवी दिल्लीः भारतीय क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. सिक्सर किंगर म्हणून दुर्राणी यांची ख्याती होती. दुर्रानी यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटातही काम केले आहे. महत्त्वाचे म्हणजे दुर्राणी यांचे आजोबा काबुलमध्ये फुटबॉलपटू होते.

- Advertisement -

सलीम दुर्राणी यांना कर्करोग झाला होता. कर्करोगाशी त्यांची सुरु असलेली झुंज रविवारी सकाळी संपली. गुजरात येथील जामनगरमध्ये सलीम दुर्राणी यांनी अखेरचा श्वास घेतला. सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दुर्राणी हे भारतीय संघाचे ऑल राऊंडर होते. दुर्राणी हे भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी एकूण १२०२ धावा केल्या आहेत. १ शतक आणि ७ अर्धशतके त्यांनी केली आहेत. संपूर्ण कारकिर्दित त्यांनी ७५ विकेट घेतल्या आहेत. भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. अर्जुन पुरस्काराने गौरव झालेले ते पहिले क्रिकेटपटू आहेत.

१९६० मध्ये त्यांनी क्रिकेट संघातून खेळण्यास सुरुवात केली. पहिला पाच दिवसीय सामना ते मुंबईत खेळले. चाहत्यांच्या मागणीनुसार सिक्सर मारण्यात दुर्राणी यांचा हातखंडा होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर १९७३ मध्ये त्यांनी चरित्र नावाच्या हिंदी चित्रपटातही काम केले. त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी ही त्या चित्रपटात हिरोईन होती.

- Advertisement -

सलीम यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी झाला. अफगाणिस्तानमधील काबूल येथे त्यांचा जन्म झाला. नंतर त्यांचे कुटुंब पाकिस्तानातील कराची येथे स्थायिक झाले. त्यावेळे दुर्राणी अवघे ८ महिन्यांचे होते. भारत- पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंबिय भारतात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्राणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. क्रिकेट विश्वात भारताचा उदय होत असताना दुर्राणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

 

- Advertisment -