केदारने चौथ्या क्रमांकावर खेळावे!

केदारने चौथ्या क्रमांकावर खेळावे!

Anshuman Gaikwad

भारतीय संघाने या विश्वचषकात चांगली कामगिरी केली असली तरी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी चांगलेच झुंजावे लागले. या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव वगळता इतर फलंदाजांचे प्रदर्शन निराशाजनक होते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या विजय शंकरला २९ धावाच करता आल्या. त्यामुळे तो या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य पर्याय आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच सहाव्या क्रमांकावर खेळणार्‍या केदारने संयमी अर्धशतकी खेळी केल्यामुळे तो चौथ्या क्रमांकासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो, असे भारताचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड यांना वाटते.

केदार हा खूप चतुर खेळाडू आहे. तो जास्त चेंडू वाया घालवत नाही. तो प्रत्येक चेंडूवर १-२ धावा काढत राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे गोलंदाज त्याला लवकर अडचणीत टाकू शकत नाहीत. तसेच त्याच्याकडे मोठे फटके लागवण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे माझ्या मते तो चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. दिनेश कार्तिकही चौथ्या क्रमांकावर चांगले प्रदर्शन करू शकेल. त्याच्या गाठीशी बराच अनुभव आहे आणि त्याने याआधी फिनिशर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. भारत जर अडचणीत असेल, तर तो संयमाने फलंदाजी करू शकेल, असे भारतासाठी ४० कसोटी सामने खेळणारे गायकवाड म्हणाले.

First Published on: June 27, 2019 4:48 AM
Exit mobile version