किंग कोहलीने बांगलादेशात रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू

किंग कोहलीने बांगलादेशात रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू

भारत आणि बांगलादेश यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय संघाची खराब सुरूवात झाली. परंतु रनमशीन विराट कोहलीने या सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जो याआधी कोणताही भारतीय खेळाडू करु शकला नाही.

विराट कोहलीने तिसऱ्या वनडे सामन्यात १६वी धाव काढताच इतिहास रचला आहे. बांगलादेशमध्ये वनडे सामन्यांमध्ये एक हजार धावा करणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणताही भारतीय फलंदाजाने अशा विक्रम केलेला नाही. कोहलीने १८ डावात एक हजार धावांचा टप्पा पार केला. दरम्यान, त्याच्या बॅटने ५ शतकं आणि ३ अर्धशतकं झळकाळली आहेत.

या सामन्यात विराट कोहलीलाही १ धावांच्या स्कोअरवर असताना मोठे जीवदान मिळाले. बांगलादेशी संघाचा कर्णधार लिटन दासने १ धावांवर शॉर्ट मिडविकेटचा झेल सोडला. ही घटना भारतीय संघाच्या डावाच्या ७ व्या षटकात घडली.

केएल रोहुलकडे संघाची कमान

उभय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या वनडेमध्ये केएल राहुल भारतीय संघाची कमान सांभाळत आहे. त्याचवेळी इशान किशनला प्लेइंग ११ मध्ये त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत इशान किशननेही शतक झळकावण्यात यश मिळविले. या मालिकेत तो प्रथमच प्लेइंग ११ चा भाग बनला आहे.


हेही वाचा : इशान किशनचा वनडे मालिकेत रेकॉर्डब्रेक विक्रम, ‘युनिव्हर्स बॉस’लाही सोडलं मागे


 

First Published on: December 10, 2022 5:35 PM
Exit mobile version