KXIP vs RCB Live Update : राहुलच्या वादळात RCB उद्धस्त; पंजाबचा पहिला विजय

KXIP vs RCB Live Update : राहुलच्या वादळात RCB उद्धस्त; पंजाबचा पहिला विजय
लोकेश राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकात २०६ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा ठोकणारा लोकेश राहुल सामनावीर ठरला.
पंजाबच्या गोलंदाजांसमोर RCB च्या फलंदाजांनी नांगी टाकली असून RCB चे ७ फलंदाज तंबुत परतले आहेत. RCB – ८६/६, वॉशिंग्टन सुंदर (१८)
डिवीलियर्सच्या रुपात RCB ला पाचवा धक्का बसला असून RCB चा अर्ध संघ तंबुत परतला आहे.   RCB – ५७/५, वॉशिंग्टन सुंदर (०) 
किंग्स इलेव्हन पंजाबने २० षटकांत ३ बाद २०६ अशी धावसंख्या उभारली. पंजाबकडून कर्णधार राहुलने ६९ चेंडूत १३२ धावांची खेळी केली.
राहुलने उत्कृष्ट फलंदाजी करत ६२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएलमधील दुसरे शतक ठरले.
शिवम दुबेने पंजाबला दोन झटके दिले. त्याने आधी निकोलस पूरन (१७) आणि ग्लेन मॅक्सवेल (५) यांना झटपट माघारी पाठवले. राहुलने मात्र एक बाजू लावून धरली आहे.
मयांक बाद झाल्यावरही लोकेश राहुलने चांगली फलंदाजी सुरु ठेवत अर्धशतक पूर्ण केले.
लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल किंग्स इलेव्हन पंजाबच्या डावाची चांगली सुरुवात झाली. मात्र, युजवेंद्र चहलने मयांकला २६ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
आरसीबीच्या संघात बदल नाही, तर पंजाबच्या संघात दोन बदल. मुरुगन अश्विन आणि जिमी निशम संघात.
या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
आयपीएलमध्ये आज किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे.
First Published on: September 24, 2020 11:47 PM
Exit mobile version