लुका मॉड्रीच ठरला ‘बॅलन डी ओर’ चा मानकरी

लुका मॉड्रीच ठरला ‘बॅलन डी ओर’ चा मानकरी

लुका मॉड्रीच

रियाल मॅड्रिड आणि क्रोएशियाचा स्टार खेळाडू लुका मॉड्रीच फुटबॉलमधील मानाच्या ‘बॅलन डी ओर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. त्यामुळे १० वर्षांनंतर पहिल्यांदाच लिओनेल मेस्सी किंवा क्रिस्तिआनो रोनाल्डो या दोघांव्यतिरिक्त एखाद्या खेळाडूला हा पुरस्कार मिळाला आहे. मॉड्रीचने फिफा विश्वचषकात अप्रतिम प्रदर्शन केले होते. त्यामुळे क्रोएशियाने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. त्याने ‘बॅलन डी ओर’ पुरस्कारासाठी रोनाल्डो आणि अँटोन ग्रीझमानला मागे टाकले. त्याचा समावेश असलेल्या रियाल मॅड्रिडने चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले होते.

विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू 

लुका मॉड्रीचने रशियामध्ये झालेल्या फिफा विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. त्याच्या अप्रतिम प्रदर्शनामुळे क्रोएशियाने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. ज्यात त्यांचा फ्रान्सने पराभव केला होता. पण लुका मॉड्रीचला विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. तर काही दिवसांपूर्वी त्याला फिफाच्या सर्वोत्तम फुटबॉलरचा पुरस्कार मिळाला होता.

इतर खेळाडूंकडून अभिनंदन

लुका मॉड्रीचला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.

 

First Published on: December 4, 2018 11:16 PM
Exit mobile version