मनीष, अय्यरची कर्णधारपदी निवड

मनीष, अय्यरची कर्णधारपदी निवड

श्रेयस अय्यर

दक्षिण आफ्रिका अविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी सोमवारी भारत अ संघाची घोषणा झाली. या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांत मनीष पांडे आणि अखेरच्या दोन सामन्यांत मुंबईकर श्रेयस अय्यर भारत अ संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेला २९ ऑगस्टपासून तिरुअनंतपुरम येथे सुरुवात होईल. प्रतिभावान फलंदाज शुभमन गिलची पाचही सामन्यांसाठी निवड झाली आहे. गिलप्रमाणेच फिट झालेला अष्टपैलू विजय शंकर, शिवम दुबे, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, नितीश राणा या खेळाडूंना मनीष आणि अय्यर या दोघांच्याही संघात स्थान मिळाले आहे.

पहिल्या तीन सामन्यांसाठी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ईशान किशनला संधी देण्यात आली आहे. तर अखेरच्या दोन सामन्यांत यष्टिरक्षणाची धुरा संजू सॅमसन सांभाळेल. भारतीय एकदिवसीय संघाचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांत खेळणार आहे. या मालिकेतील सामने २९, ३१ ऑगस्ट, २,४,८ सप्टेंबरला होणार आहेत.

भारत अ संघ –

पहिल्या तीन सामन्यांसाठी : मनीष पांडे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, ईशान किशन (यष्टीरक्षक), विजय शंकर, शिवम दुबे, कृणाल पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, खलील अहमद, नितीश राणा.

चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी : श्रेयस अय्यर (कर्णधार), शुभमन गिल, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, विजय शंकर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चहर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, ईशान पोरेल.

First Published on: August 20, 2019 5:56 AM
Exit mobile version