मेरी कोमने जिंकले सुवर्ण पदक

मेरी कोमने जिंकले सुवर्ण पदक

सौजन्य - Mathrubhumi English

पोलंड येथे सुरू असलेल्या सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेच्या ४८ किलो वजनी गटात मेरी कोमने कझाकिस्तानच्या कासानायेव्हाचा ५-० असा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले. तर ५४ किलो वजनी गटात भारताच्या मनिषाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

मेरीचे दमदार पुनरागमन

२०१८ वर्षाच्या सुरूवातीला मेरी कोमने इंडिया ओपन आणि राष्ट्रकुल स्पर्धा या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. त्यामुळे एशियाडमध्येही तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे तिने एशियाडमधून माघार घेतली होती. पण सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेत पुनरागमन करत तिने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली.

अंतिम सामन्यात चमक 

४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या कासानायेव्हाच्या जास्त उंचीचा तिला फायदा होईल असा अंदाज होता. पण मेरीने चतुराईने बॉक्सिंग करत या सामन्यात कासानायेव्हाला एकही गुण जिंकू दिला नाही. त्यामुळे तिने हा सामना ५-० असा जिंकला.

मनिषाचा अंतिम सामन्यात पराभव 

५४ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात युक्रेनच्या इव्हाना क्रुपेनियाने भारताच्या  ५४ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात युक्रेनच्या इव्हाना क्रुपेनियाने भारताच्या मनिषावर ३-२ असा पराभव केला. हा सामना अतिशय चुरशीचा झाला. पण मोक्याच्या क्षणी क्रुपेनियाने आपला खेळ उंचावल्याने तिने हा सामना ३-२ असा अवघ्या एका गुणाने जिंकला.
First Published on: September 16, 2018 5:44 PM
Exit mobile version