Milkha Singh passed away: भारताचे Flying Sikh मिल्खा सिंग यांचे निधन

Milkha Singh passed away: भारताचे Flying Sikh मिल्खा सिंग यांचे निधन

Milkha Singh passed away: भारताचे Flying Sikh मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन

भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले. (Milkha Singh passed away) मिल्खा सिंग ९१ वर्षांचे होते. १७ मे रोजी मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जावणवल्याने त्यांना ३१ मे रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर ते त्यांच्या घरी आराम करत होते. काही दिवसाआधीच मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला मिल्खा यांचेही कोरोनामुळे निधन झाले. पत्नी पाठोपाठ शुक्रवारी रात्री ११ वाजता पंजाबच्या चंदीगड येथील रुग्णालयात मिल्खा सिंग यांचीही प्राणज्योत मालवली.(Milkha Singh passed away: Former Indian sprinter Flying Sikh Milkha Singh passed away due to Corona)


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत मिल्खा सिंग यांना श्रद्धाजली वाहिली आहे. मोदी आणि मिल्खा सिंग यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. ‘मिल्खा सिंग यांच्या जाण्याने देशाने एक महान खेळाडू गमावला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात मिल्खा सिंग यांनी स्वत: एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व फार कमी वेळात लाखो लोकांपर्यंत पोहचले. पण आता ते आपल्यात नाहीत. मी काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्यासोबत बोललो होतो. पण आमचे संभाषण शेवटचे संभाषण ठरेल असे मला वाटले नव्हते’, अशा भावना पतंप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत.

मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर अभिनेता फरहान अख्तरही भावूक झाला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर त्याने मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माझे प्रिय मिल्खा जी, तुम्ही हे जग सोडून गेलात हे माझे मन अद्याप स्वीकारत नाहीये. कदाचित हा माझा जिद्दी स्वभाव आहे जो तुमच्याकडून मला शिकायला मिळाला. एकादी गोष्ट गोष्ट करायची ठरवल्या नंतर ती केल्या पूर्ण केल्याशिवाय हार मानायची नाही. खरं हेच आहे की तुम्ही नेहमी जिवंत आहात कारण तुम्ही मोठे दिलदार आहात. लोकांवर प्रेम करणारे जमिनीशी जोडलेले माणूस आहात,अशा भावना फरहान अख्तरने व्यक्त केल्या आहेत.

 

 

मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर क्रिडा,कला,राजकीय क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

 


हेही वाचा – KKK11: स्पर्धक वरुण सूदला स्टंट करताना गंभीर दुखापत

 

First Published on: June 19, 2021 8:48 AM
Exit mobile version