मिताली राजची धडाकेबाज कामगिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २० हजार धावांचा टप्पा पार

मिताली राजची धडाकेबाज कामगिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २० हजार धावांचा टप्पा पार

मिताली राजची धडाकेबाज कामगिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २० हजार धावांचा टप्पा पार

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आपल्या क्रिकेट कारकीर्दीमधील २० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विक्रम केला आहे. सलग पाचव्यांदा मितालीने अर्धशतकीय खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीमने ५० षटकांत २२५ धावा केल्या. मिताली राजने फर्स्ट क्लास क्रिकेट, लिस्ट ए आणि टी-२० अशा प्रकरांमध्ये मिळून २० हजार रणांचा टप्पा पार केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी उतरलेल्या भारतीय संघाने चांगली खेळी केली होती. मितालीने १०७ चेंडूंमध्ये एकूण ६१ धावांची भागिदारी केली आहे. तसेच तिने केलेल्या अर्धशतकांमध्ये भर पडली असून एकूण ५९ अर्धशतके केलेत तर सलग ५ वेळा अर्धशतकांची नोंद करण्यात मिताली यशस्वी झाली आहे. मितालीने अर्धशतकांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७९ धावा केल्या आहेत. यानंतर तीन एक दिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात ७२,दुसऱ्या सामन्यात ५९ तर तिसऱ्या सामन्यात ७५ धावा काढल्या आहेत.

मितालीने आक्रमकपणे केलेल्या अर्धशतकीय खेळीमुळे भारतीय महिला संघाला २०० धावांचा आकडा गाठण्यासाठी मदत झाली. मिताली राज उत्कृष्ट खेळली तर स्मृती मंधानाला चांगली खेळी करम्यामध्ये अपयशी ठरली असून १६ धावा करण्यात यश मिळालं आहे. मितालीपाठोपाठ ऋचा घोष ३२ धावा, झूलन गोस्वामी २० धावा, यास्तिका भाटिया ३५ धावांची भागिदारी केली आहे.

भारतीय संघाचा पराभव

मितालीराजने चांगली खेळी केली असली तरी भारतीय संघाला विजय मिळवण्यात अपश आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ ९ विकेट्सनी पराभूत झाला आहे. ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने पहिले फलंदाजी करत ५० षटकांमध्ये ८ बाद २२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४१ षटकांमध्ये १ बाद २२७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाने ऑस्ट्रेलियाने पाठोपाठ २५ सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.

First Published on: September 21, 2021 5:27 PM
Exit mobile version