मोहम्मद मुश्ताक अहमद हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

मोहम्मद मुश्ताक अहमद हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

सौ - Times Of India

मोहम्मद मुश्ताक अहमद यांची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याआधी मोहम्मद मुश्ताक अहमद हे हॉकी इंडियाच्या महासचिव पदावर कार्यरत होते. सोमवारी हॉकी इंडियाची आठवी निवडणूक पार पडली. यामध्ये अहमद यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली. याचसह हॉकी इंडियाचे नवीन १३ सदस्सीय कार्यकारी मंडळही निवडण्यात आले आहे. यामध्ये मणिपूर हॉकीचे ज्ञानेंद्रो निंगोबम यांची हॉकी इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.


याआधी राजिंदर सिंग हे हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. पण आता त्यांचा कार्यकाळ संपला असल्याने नवीन अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.

First Published on: October 1, 2018 11:21 PM
Exit mobile version