PBKS vs MI : मुंबईचा तिसरा विजय, सूर्याची अर्धशतकी खेळी; 9 धावांनी पंजाबचा पराभव

PBKS vs MI : मुंबईचा तिसरा विजय, सूर्याची अर्धशतकी खेळी; 9 धावांनी पंजाबचा पराभव

PBKS vs MI पंजाब : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने तिसरा विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने 9 धावांनी पंजाबवर विजय मिळवला. या सामन्यात प्रथन फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 193 धावांचे आव्हान पंजाबसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला केवळ 183 धावांपर्यंतच मजल मारता आली. (mumbai indians beat punjab kings by 9 runs suryakumar yadav ipl 2024)

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात सलामीवर रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण ईशान किशनला जास्त धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सावरत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मुंबईने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा सामना करताना पंजाब किंग्सची सुरुवात अतिशय खराब झाली.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड? संभाव्य खेळडूंची यादी जारी

या सामन्यात पंजाबने अवघ्या 77 धावांपर्यंत सहा फलंदाज गमावले होते. पंजाबची आघाडीची फळी फेल ठरली होती. एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार सॅम करन 6 धावांवर बाद झाला. तसेच, प्रभसिमरन शून्यावर बाद झाला. रायली रुसो फक्त एक धाव काढून बाद झाला. लियाम लिव्हिंगस्टोनही एका धावेवरच बाद झाला. हरप्रीत सिंह यानं संघर्ष केला पण तोही 13 धावांवर गोपालचा शिकार ठरला. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबच्या फलंदाजांना चांगली खेळी करता आली.

दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह याने भेदक मारा केला. बुमराहने सॅम करन, रायली रुसो आणि शशांक सिंह यांना बाद केले. बुमराहने चार षटकामध्ये फक्त 21 धावा देत तीन विकेट घेतल्या. गेराल्ड कोइत्जे याने 4 षटकात 31 धावा देत 3 फलंदाजांना बाद केले. कोइत्जे याने प्रभसिमरन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि आशुतोष शर्मा यांना बाद केले. हार्दिक पांड्या, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.


हेही वाचा – IPL Birthday : 16 वर्षांपूर्वी खेळला गेला पहिला सामना; जाणून घेऊया आजपर्यंतचा प्रवास

Edited By – Vaibhav Patil 

First Published on: April 19, 2024 10:02 AM
Exit mobile version