घरक्रीडाT20 World Cup 2024 : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड?...

T20 World Cup 2024 : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड? संभाव्य खेळडूंची यादी जारी

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2024) टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्डकपसाठी सर्वच संघातील खेळाडू सराव करत आहे. तसेच, प्रत्येक संघाची निवड समितीदेखील योग्य खेळाडूंची निवड करण्यासाठी चाचपणी करत आहेत.

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2024) टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्डकपसाठी सर्वच संघातील खेळाडू सराव करत आहे. तसेच, प्रत्येक संघाची निवड समितीदेखील योग्य खेळाडूंची निवड करण्यासाठी चाचपणी करत आहेत. अशात, टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निश्चित झाला असून, या संघात 20 खेळाडूंची निवड केल्याची माहिती समोर आली आहे. (T20 World Cup 2024 Team India Probable 20 Players Squad For Upcoming T20 World Cup Rohit Sharma Will Be Lead)

आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपसाठी 20 संघांना आपला स्क्वॉड जाहीर करण्यासाठी 1 मे ही अखेरची तारीख दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 20 खेळाडूंची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. त्यानुसार, भारतीय संघाच्या मेन स्क्वॉडमध्ये 15 मुख्य आणि 5 राखीव खेळाडू असणार आहेत. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Travis Head : सर्वात जलद शतक करणार चौथा खेळाडू; ट्रॅव्हिस हेडची बंगळुरूसमोर फटकेबाजी

यंदा टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात आयपीएलच्या खेळाडूंना संधी दिली जाणार नसून, जे खेळाडू आतापर्यंत टीम इंडियासाठी खेळले आहेत, त्यांनाच संधी मिळणार असल्याची माहिती मिळते. कारण याआधी बीसीसीआयने आयपीएलमध्ये उत्तर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात खेळण्याची संधी दिली. यावरुन बीसीसीआयवर टीकाही करण्यात आली. त्यामुळे बीसीसीआयने ही खबरदारी घेतल्याचे समजते.

- Advertisement -

भारतीय संघाचे टी 20 वर्ल्ड कप वेळापत्रक

टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ आहेत. त्यानुसार 5-5 नुसार 20 संघ 4 गटात विभागण्यात आले आहेत. भारतीय संघ ए ग्रुपमध्ये आहे. पाकिस्तान, कॅनेडा, यजमान यूएसए आणि आयर्लंडचा समावेश आहे. त्यानुसार प्रत्येक टीम साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना हा आयर्लंड विरुद्ध असणार आहे. तर अखेरचा सामना कॅनेडा विरुद्ध होणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी 20 संभाव्य खेळाडूंची नावं : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि आवेश खान.


हेही वाचा – SRH VS RCB : हैदराबादने रचला धावांचा डोंगर; सर्वाधिक धावसंख्या करत स्वत:चा विक्रम मोडला

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -