पाय घसरून जमिनीवर कोसळला, पण हरला नाही.., नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी

पाय घसरून जमिनीवर कोसळला, पण हरला नाही.., नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी

Paris Olympics Neeraj Chopra s two targets in one javelin Olympic ticket final

भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी केली आहे. फिनलँडमध्ये सुरू असलेल्या कुओर्ताने स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवलं आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर आता फिनलँडमध्ये सुद्दा त्याने पुन्हा एकदा सोनं लुटलं आहे. ऑलिम्पिकनंतरच्या पहिल्या स्पर्धेत त्याने नॅशनल रेकॉर्ड स्थापित केलं होतं. मात्र, सुवर्ण कामगिरी करत असताना त्याला अनेक संकाटांचा सामना करावा लागला. तो भालाफेक करताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. परंतु त्याने जिद्द सोडली नाही, त्याने आपलं स्वप्न साकार केलं.

फिनलँडमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत नीरजने ८६.६९ मीटर लांब भाला फेकत गोल्ड मेडल आपल्या नावे केलं. नीरजच्या फॅन्सची अपेक्षा होती की, तो ९० मीटरचा मार्क पार करेल. पण तसं होऊ शकलं नाही. नीरजने मागील आठवड्यामध्ये तुर्कुमध्ये ८९.३० मीटर पर्यंत भालाफेक केला होता. यावेळी पावो नुरमी स्पर्धेत रजत पदक पटकावलं होतं. तो फक्त ९० मीटरपासून ७० सेंटीमीटरने फक्त चुकला होता.

नीरजने त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशरन वॉलकॉट आणि ग्रेनेडचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स यांना मागे टाकत पदक जिंकण्यात यश मिळवले. तर दुसरे स्थान पटकावणारा वॉलकॉटने ८६.६४ मीटर भालाफेक केला होता. तर टोनी केरॅनेनने ८२,१० मीटरपर्यंत भालाफेक केली. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८६.६९ मीटरपर्यंत भाला फेकला. तिसऱ्या वेळी भालाफेक करताना दुखापतीपासून बचावला. कारण तो भालाफेक करत असताना त्याचा पाय अचानक घसरला आणि तो जमिनीवर कोसळला. पण त्याने आपली जिद्द न हरता सुवर्णपदक पटकावले.

दरम्यान, ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५७ मीटर अंतरावर भालाफेक करून पदक जिंकले आहेत. मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्यात मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने नीरजला सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ३८४ जणांसाठी वीरता पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.


हेही वाचा :राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणार नीरज चोप्रा, AFI ने केली संघाची निवड


 

First Published on: June 19, 2022 1:09 PM
Exit mobile version