नाशिकचा हिमांशु चमकला

नाशिकचा हिमांशु चमकला

हिमांशू

नाशिकच्या हिमांशूने जलद १०० सुर्यनमस्कार अवघ्या ७मिनिटांत करून नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. संपूर्ण भारतासाठी गौरवार्ह अशी ही ऐतिहासिक कामगिरी त्याने शनिवारी १६ फेब्रुवारीस सकाळी १० वाजता डॉ. ढेकणे हाँल बी.वाय.के. महाविद्यालय नाशिक येथे केली.

हिमांशू मंचावर आला नोबेल वर्ल्ड रेकॉर्डचे एडज्युडीकेटर यांनी परवानगी देत स्टाप वॉचवर वेळेचे बटन दाबताच सुर्य नमस्काराला सुरूवात झाली. काऊंटींग सुरू १,२,३,४,५ याप्रमाणे जसजशी अंक मोजली जात होते तसतशी हिमांशूची सुर्य नमस्काराची गती वाढत होती, उपस्थितांची उत्कंठा वाढत होती, सुरूवातीची पाच मिनिटे एकदम शांतता होती, त्यानंतर सर्वांनी हिमांशूला जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आणि फक्त ७ च मिनिटांत १०० सुर्य नमस्कार पुर्ण करीत हिमांशूने इतिहास रचला.

त्यानंतर नोबेल वर्ल्ड रेकॉर्डचे एडज्युडीकेटर यांनी वेळेची नोंद करीत रेकॉर्ड जाहीर केला व प्रमाणपत्र त्या सन्मानचिन्ह जागतिक नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे लवकरच प्रदान करण्यात येईल अशी घोषणा करताच सर्व उपस्थितांनी एकच जल्लोष केला. कार्यक्रमाचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ मो. स गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, स्पोर्टस् डायरेक्टर डॉ सुनील मोरे, अशोक दुधारे, आनंद खरे, प्रविण व्यवहारे, छत्रपती पुरस्कार विजेते संजय होळकर, गोपाळ गायकवाड, मनिषा गायकवाड आदी उपस्थित होते.

First Published on: February 17, 2019 4:35 AM
Exit mobile version