Novak Djokovic Vaccination : लसीकरणाची सक्ती केल्यास ट्रॉफी सोडण्यास तयार – नोवाक जोकोविच

Novak Djokovic Vaccination : लसीकरणाची सक्ती केल्यास ट्रॉफी सोडण्यास तयार – नोवाक जोकोविच

Novak Djokovic Vaccination : लसीकरणाची सक्ती केल्यास ट्रॉफी सोडण्यास तयार - नोवाक जोकोविच

कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे टेनिसपटू नोवाक जोकोविच चर्चेत आहे. जर लसीकरणासाठी सक्ती केली तर ट्रॉफी सोडण्यास तयार असल्याचे नोवाक जोकोविच म्हणाला आहे. आपण कोरोना लसीकरणाच्या विरोधात नाही परंतु आपल्याला लसीकरणासाठी कोणी जबरदस्ती करु शकत नाही. जर जबरदस्ती करुन कोरोना लसीकरण करण्यास सांगितले तर ट्रॉफी सोडण्यासाठी तयार असल्याचे नोवाक जोकोविचने सांगितले आहे.

टेनिस स्टार नोवाक जोकोविच जगातील नंबर वन टेनिस खेळाडू आहे. वर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीकरणाच्या सक्तीमुळे ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कारण जोकोविचने कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती. २० ग्रँडस्लॅम जिंकणारा जोकोविच म्हणाला की, तो कोरोना लसीविरुद्धच्या मोहिमेत सहभागी नाही, पण तो प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देतो. लस घ्यायची की नाही हे निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असले पाहिजे.

जोकोविच विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनमधून बाहेर पडण्यास तयार

जोकोविच म्हणाला जर विम्बल्डन ओपन आणि फ्रेंच ओपनमध्ये खेळण्यासाठी कोरोनाची लस अनिवार्य केली गेली आणि त्यांना लस घेण्याची सक्ती केली गेली, तर ते दोन्ही ग्रँड स्लॅम सोडण्यास तयार आहोत. त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला आणि सांगितले की लहान असतो तर लस घेतली असती, परंतु प्रत्येक माणसाला त्याच्या शरीरात जे हवे आहे ते घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे या वस्तुस्थितीचे त्यांनी नेहमीच समर्थन केले आहे.

माझी तत्त्वे ग्रँडस्लॅमपेक्षा महत्त्वाची

जेव्हा जोकोविचला विचारण्यात आले की तो अधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी का सोडत आहे, तेव्हा त्याने उत्तर दिले की त्याच्या स्वातंत्र्याचा सिद्धांत त्याच्यासाठी ग्रँडस्लॅम किंवा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आहे. ते शक्य तितके त्यांच्या शरीराचे काहीही चुकीचे करणे टाळत आहेत. जोकोविच या महिन्यात दुबई टेनिस चॅम्पियनशिपद्वारे कोर्टवर परतत आहे. याशिवाय पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या इंडियन वेल्स एटीपी मास्टर्समध्येही जोकोविचच्या नावाचा समावेश आहे.


हेही वाचा : Ind Vs SL New Schedule: लखनौमध्ये रंगणार भारत-श्रीलंका पहीला टी-२० सामना, BCCI ने जारी केले नवे शेड्यूल

First Published on: February 15, 2022 7:33 PM
Exit mobile version