WT20 Challenge 2022: ‘फ्लाइंग लेडी’ हरमनप्रीत; हवेत झेल पकडत फलंदाजाला केले बाद, व्हिडीओ व्हायरल

WT20 Challenge 2022: ‘फ्लाइंग लेडी’ हरमनप्रीत; हवेत झेल पकडत फलंदाजाला केले बाद, व्हिडीओ व्हायरल

सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी (Velocity vs Supernovas) यांच्यात यंदाच्या महिला टी-20 चॅलेंज (WT20 Challenge 2022) स्पर्धेतील दुसरा सामना झाला. या सामन्यात व्हेलोसिटी संघाने 7 विकेट्सनी सुपरनोव्हास संघाचा पराभव केला. मात्र या सामन्यात क्षेत्ररक्षणावेळी हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur)अप्रतिल झेल पकडून फलंदाजाला बाद केले. विशेष म्हणजे हरमनप्रीत कौरने हा झेल हवेत पकडला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हेलोसिटी संघाच्या डावातील 10 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शेफाली वर्माने जोरात फटका मारला. त्यावेळी हरमनप्रीत कौरने हवेत उडी मारून एका हाताने झेल पकडला. तिने झेल पकडताच मैदानातील खेळाडूंसह सर्व क्रिकेट प्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. सध्या तिचा झेल पकडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हरमनप्रीत कौरचे कौतूक केले जात आहे. विशेष म्हणजे चाहत्यांनी हरमनप्रीत कौरला ‘फ्लाइंग लेडी’ आणि सुपरवुमन म्हणत आहेत.

प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी यांच्यातील सामन्यात या सामन्यात नाणेफेक जिंकून व्हेलोसिटीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सुपरनोव्हासच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना हरमनप्रीत कौरने 51 चेंडूत 71 धावांची खेळी केली. तसेच, शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि लॉरा वोल्वार्ड (Laura Wolvaardt) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर व्हेलोसिटीने (Velocity) सुपरनोव्हासला (Supernovas) सात विकेट्सनं पराभूत केलं आहे.

सर्वाधिक 71 धावांची खेळी

सुपरनोव्हासकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. व्हेलोसिटीकडून केट क्रॉसनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


हेही वाचा – Ind vs Jpn, Asia Cup Hockey : हॉकी सामन्यात जपानकडून भारतीय संघाचा पराभव

First Published on: May 24, 2022 9:31 PM
Exit mobile version