Ind vs Jpn, Asia Cup Hockey : हॉकी सामन्यात जपानकडून भारतीय संघाचा पराभव

आशिया कप २०२२ स्पर्धेतील (Hero Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात जपान संघाने (Japan Team) भारतीय संघाचा (Team India) पराभूत केला आहे. जपानकडून ५-२ च्या मोठ्या फरकाने पराभूत झाला आहे. पहिल्या दिवशी पाकिस्तानविरूद्ध (Pakistan) सामना १-१ च्या फरकाने अनिर्णीत झाल्यानंतर आज भारतीय संघ ५-२ च्या फरकाने पराभूत झाला. जपान संघाने सामन्याच्या सुरूवातीपासूनच आपली पकड भक्कम ठेवली होती. त्यामुळे अखेरच्या काही मिनिटांपर्यंत जपानने उत्कृष्ट खेळी करत सामन्यातील आघाडी कायम ठेवली.

जपान संघाने सामन्याच्या सुरूवातीलाच आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघाना गोल करता आला नाही. पण दुसऱ्याच क्वॉर्टरमध्ये जपानच्या यामासाकी कोजीने बॉटम कॉर्नरमध्ये चेंडू ढकलत पहिला गोल केला आहे. कावाबे कोसेने गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. तर भारताकडून पवन राजभरने अप्रतिम गोल करत भारतीय संघाच्या विजयाच्या आशा राखून ठेवल्या होत्या.

दरम्यान, जपान संघाने गोल करत ३-२ ची आघाडी मिळवली. तसेच ५० व्या मिनिटाला भारतीय संघाने आणखी एक गोल करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर जपानने सलग दोन करत सामना ५-२ ने जिंकत विजय मिळवला.

हेही वाचा : French Open 2022 : नदालने मोडीत काढला रॉजर फेडररचा विक्रम, एकाच ग्रँडस्लॅममध्ये सर्वाधिक सामन्यांत विजयी

आशिया कप २०२२ मधील पूल ए मध्ये भारत, पाकिस्तान, जपानसोबत यजमान संघ इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. आता जपान संघानंतर येत्या २६ मे रोजी भारतीय संघाचा सामना इंडोनेशियाशी होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ आघाडी मिळवणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासांत ३३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर एकाचा मृत्यू