घरक्रीडाICC ODI Ranking: हरमनप्रीत कौर चौदाव्या स्थानावर तरी फायद्यात; पण मिताली अन्...

ICC ODI Ranking: हरमनप्रीत कौर चौदाव्या स्थानावर तरी फायद्यात; पण मिताली अन् मंधानाचं नुकसान

Subscribe

भारतीय कर्णधार मिताली राज सहाव्या स्थानावरून ७ व्या स्थानावर तर स्टार सलामीवीर स्मृती मानधना नवव्या स्थानावर घसरली आहे. ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक-फलंदाज अॅलिसा हिलीने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

आयसीसीनं नुकताच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताची उपकर्णधार हरमनप्रीत कौर चौदाव्या स्थानावर पोहोचली आहे. पण असं असलं तरी हरमनप्रीत कौर फायद्यात आहेत. ७ सामन्यांत ३१८ धावांसह विश्वचषकात भारताची दुसरी सर्वोत्तम फलंदाज ठरली आहे. तसंच, भारतीय कर्णधार मिताली राज सहाव्या स्थानावरून ७ व्या स्थानावर तर स्टार सलामीवीर स्मृती मानधना नवव्या स्थानावर घसरली आहे. ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक-फलंदाज अॅलिसा हिलीने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या मितालीचे ६८६ रेटिंग गुण आहेत. मितालीला विश्वचषकात ७ सामन्यांत २६च्या सरासरीने १८२ धावा करता आल्या. तसंच, स्मृती मानधनाने विश्वचषक स्पर्धेत ७ सामन्यांत ४६.७१च्या सरासरीनं ३२७ धावा केल्या असून, तिचे ६६९ गुण झाले आहेत.

- Advertisement -

भारताची उपकर्णधार हरमनप्रीत कौरही चौदाव्या स्थानावर पोहोचली आहे. हरमनप्रीत ७ सामन्यांत ३१८ धावांसह विश्वचषकात भारताची दुसरी सर्वोत्तम फलंदाज ठरली आहे. या क्रमवारीत इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात १७० धावांच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक-फलंदाज अॅलिसा हिलीने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. तिने दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वोल्वार्टला मागे टाकले.

एलिसाने विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ शतकं आणि २ अर्धशतकांच्या मदतीनं ५०९ धावा केल्या आणि यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट १०३.६६ होता. ती या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. अॅलिसाशिवाय या क्रमवारीच्या पहिल्या ६ फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी, मेग लॅनिंग आणि रॅचेल हेन्स यांचाही समावेश आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाबाद १४८ धावांची खेळी करणारी इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू नेट सायव्हर दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिनं एलिस पॅरीला मागे टाकले आहे.

- Advertisement -

गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन पहिल्या क्रमांकावर कायम आहे तर, दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज अन्या श्रबसोलने पाच स्थानांची झेप घेत या क्रमवारीच्या अव्वल १० गोलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. भारताची झुलन गोस्वामी पाचव्या स्थानावर कायम आहे.


हेही वाचा – ICC ODI Ranking: आयसीसी ODI क्रमवारीत बांगलादेश पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -