फिट राहण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम विराट कोहलीप्रमाणे करतोय ‘हे’ काम

फिट राहण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम विराट कोहलीप्रमाणे करतोय ‘हे’ काम

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकिस्तान आणि नेदरलँड्सचे संघ आमनेसामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 18 आणि 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. तिन्ही सामने रॉटरडॅम येथील हेजलरवेग स्टेडियमवर खेळवले जातील. या मालिकेसाठी पाकिस्तानी संघ नेदरलँडला पोहोचला आहे. तिथे संपूर्ण टीम जिममध्ये घाम गाळताना दिसली.

पाकिस्तानच्या खेळाडूंची अशी चित्रे क्वचितच समोर येतात. कर्णधार बाबर आझम फिटनेसवर लक्ष केंद्रित करताना दिसला. बाबरची तुलना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीशी केली जाते. बाबरने या तुलनेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे आणि तो कोहलीकडून शिकतो असे अनेक वेळा सांगितले आहे. उत्कृष्ट फलंदाजीसोबतच विराट त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. बाबरही त्याचाच मार्ग अवलंबताना दिसतो.

 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, इमाम-उल-हक सारखे खेळाडू वर्कआउट करताना दिसत होते. ही मालिका आयसीसी वनडे सुपर लीगचा भाग आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत यजमान भारत वगळता सात संघांना थेट प्रवेश मिळणार आहे.

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघात वेगवान गोलंदाज हसन अलीची निवड करण्यात आलेली नाही. आशिया चषक आणि नेदरलँड दौऱ्यातून तो बाहेर गेला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झालेल्या शाहीन आफ्रिदीची पूर्ण तंदुरुस्त नसतानाही निवड करण्यात आली आहे.

पाकिस्तान संघ नेदरलँडमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्या दौऱ्यासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंना आशिया कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, मोहम्मद हारिस, सलमान अली आणि झाहिद महमूद हे खेळाडू आहेत. आशिया कपसाठी आसिफ अली, हैदर अली, इफ्तिखार अहमद आणि उम्मन कादिर यांची निवड करण्यात आली आहे. शादाब खान संघाचा उपकर्णधार असेल.

First Published on: August 14, 2022 8:34 PM
Exit mobile version