IPL 2022: पृथ्वी शॉने वेगवान खेळीच्या जोरावर मोडला वीरेंद्र सेहवागचा IPL मधील सर्वात मोठा विक्रम

IPL 2022: पृथ्वी शॉने वेगवान खेळीच्या जोरावर मोडला वीरेंद्र सेहवागचा IPL मधील सर्वात मोठा विक्रम

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएल २०२२ च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळीत दिसला नाही. परंतु आता त्याने वेग पकडला असून केकेआरविरुद्ध २ षटकारांच्या मदतीने जबरदस्त फलंदाजी केली आहे. २९ चेंडूत ७ चौकार आणि ५१ धावांची खेळी करत त्याने डेव्हिड वॉर्नरसोबत दमदार खेळाला सुरुवात करून दिली आणि या जोरावर दिल्लीच्या संघाने केकेआरविरुद्ध २० षटकांत ५ बाद २१५ अशी मोठी धावसंख्या उभारली. शॉने वॉर्नरसोबत पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली होती. तर वॉर्नरनेही ६१ धावांचे योगदान दिले होते.

पॉवरप्लेमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करणारा भारतीय फलंदाज म्हणून पृथ्वी शॉ आता आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पृथ्वी शाने या लीगमधील पॉवरप्लेमध्ये ५७ डावांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आला. दुसरीकडे केएल राहुल हा भारतीय फलंदाज म्हणून या लीगमधील सर्वात कमी डावात पॉवरप्लेमध्ये १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज आहे.

केकेआरसमोर दिल्लीकडून खेळताना पृथ्वी शाने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ६१ धावांची शानदार खेळी केली होती. आता केकेआरविरुद्ध त्याने ५१ धावांची खेळी केली आहे. तसेच याच खेळीच्या जोरावर त्याने सेहवागचा विक्रम मोडीत काढला आहे.

आयपीएलमधील सर्वात कमी डावात पॉवरप्लेमध्ये १००० धावा पूर्ण करणारे सहा फलंदाज

५६ डाव – केएल राहुल

५७ डाव – पृथ्वी शॉ

५९ डाव – वीरेंद्र सेहवाग

६७ डाव – सचिन तेंडुलकर

६७ डाव – सचिन तेंडुलकर

६७ डाव – मुरली विजय


हेही वाचा : विद्यार्थ्यांना फायनान्स लिट्रसीचे धडे दिले जाणार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती


 

First Published on: April 11, 2022 2:32 PM
Exit mobile version