PV Sindhu : सिंधूकडे मोठी जबाबदारी; बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशनची बनली सदस्य

PV Sindhu : सिंधूकडे मोठी जबाबदारी; बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशनची बनली सदस्य

दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये पदक विजेती आणि भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूवर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान आता तिला बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशनचे सदस्य बनवण्यात आले आहे. २६ वर्षीय माजी विश्वविजेती सिंधू २०२५ पर्यंत इतर पाच सदस्यांसोबत ॲथलीट्स कमिशनचे सदस्य म्हणून काम करेल. बीडब्ल्यूएफ कडून एका निवेदनात म्हटले की, “बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशन २०२१-२०२५ साठी सहा सदस्यांची घोषणा करताना फेडरेशनला आनंद होत आहे. आयरिस वांग (यूएसए), रॉबिन टेबेलिंग (नेदरलँड), ग्रासिया पोली (इंडोनेशिया), किम सोयोंग (कोरिया), पी.व्ही सिंधू (भारत), झेंग सी वेई (चीन)”. या एकूण सहा खेळाडूंचा या यादीत समावेश झाला आहे.

दरम्यान, सदस्यांच्या यादीत सिंधूसहीत आणखी पाच वेगवेगळ्या देशातील खेळाडूंचा समावेश आहे. निवेदनात फेडरेशनने हे देखील म्हटले की, नवीन आयोग लवकरच याबाबत बैठक घेईल आणि या सहा सदस्यांमधील अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करेल.

पी.व्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये एका पाठोपाठ एक विक्रमांना गवसणी घातली आहे. तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. याशिवाय तिने २०१९ मध्ये प्रतिष्ठित जागतिक चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांसहीत सुवर्णपदके जिंकली आहेत.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात पराभव झाला होता. पी.व्ही सिंधू या पराभवासोबतच स्पर्धेतून देखील बाहेर गेली होती. त्यावेळी सिंधू तिचा किताब वाचवू शकली नाही. जगातील पहिल्या क्रमांकाची बॅडमिंटनपटू ताइ जू यिंगने सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता. ४२ मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूचा १७-२१, १३-२१ ने पराभव झाला होता.


हे ही वाचा: http://Rafael Nadal : टेनिस स्टार राफेल नदालला कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती


 

First Published on: December 20, 2021 7:43 PM
Exit mobile version