PV Sindhu : पी.व्ही सिंधू लढणार निवडणूक; जाणून घ्या कोणत्या पदासाठी असणार मैदानात

PV Sindhu : पी.व्ही सिंधू लढणार निवडणूक; जाणून घ्या कोणत्या पदासाठी असणार मैदानात

दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही सिंधू १७ डिसेंबरपासून स्पेनमध्ये होणार्‍या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये बीडब्ल्यूएफ अॅथलीट्स आयोगाची निवडणूक लढणार आहे. सध्या सिंधू विश्वचॅम्पियन इंडोनेशियातील बालीमध्ये ओपन सुपर १००० ची स्पर्धा खेळत आहे. ती सहा पदांसाठी नामांकित नऊ खेळाडूंपैकी एक आहे. अॅथलीट्स आयोगाची निवडणूक २०२१ ते २०२५ च्या कालावधीसाठी स्पेनमध्ये १७ डिसेंबर २०२१ रोजी टोटल एनर्जी वर्ल्ड चॅम्पियनशिपसोबत होणार आहे. निवडणुकीत सहभागी असलेल्या खेळांडूमध्ये पी.व्ही सिंधू एकच आहे जी दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहे. तिने यापूर्वी २०१७ मध्ये देखील निवडणुक लढली आहे.

या निवडणुकीसाठी ती सहा महिला प्रतिनिधींपैकी एक आहे. सिंधूसोबत टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेती आणि इंडोनेशियाची महिला दुहेरी खेळाडू ग्रेशिया पोली असणार आहे. सिंधूची मे महिन्यात आयओसीच्या ‘बिलीव्ह इन स्पोर्ट्स’ मोहिमेसाठी अॅथलीट्स कमिशनमध्येही निवड झाली होती.

पी.व्ही सिंधूने सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास रचला होता. रिओ ऑलिम्पिक २०१७ मधील रौप्य पदक विजेत्या सिंधूने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये कांस्य पदक जिंकले होते. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी एकमेव भारतीय खेळाडू आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सिंधूला भारताचा तिसरा सर्वोच्च असलेला पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. ५ जुलै १९९५ ला जन्मलेल्या सिंधूने २०१९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवणारी सिंधू पहिली बॅडमिंटनपटू होती. दरम्यान सिंधूला खेलरत्न पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे.


हे ही वाचा: IND vs SA : भारतीय संघाला मोठा झटका, दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेत हा दिग्गज खेळाडू नसण्याची चिन्हं


 

First Published on: November 23, 2021 3:32 PM
Exit mobile version