रॉजर फेडरर पुन्हा अव्वल, तर महिलांमध्ये सिमाॅन हेलप आघाडीवर

रॉजर फेडरर पुन्हा अव्वल, तर महिलांमध्ये सिमाॅन हेलप आघाडीवर

पहिला क्रमांक पतकावणारा रॉजर

एटीपी रँकिंगमध्ये स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर पुन्हा एकदा अव्वल स्थानावर दाखल झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या मानांकनामध्ये मार्च महिन्यानंतर टेनिस कोर्टवर न उतरताही फेडररने अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे राफेल नदालला माद्रिद ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याचा फटका बसला असून जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वलस्थान त्याला गमवावे लागले आहे. तसेच माजी अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचची अजून सहा स्थानांनी घसरण होऊन तो १८व्या स्थानावर पोहोचला आहे. २००६ च्या ऑक्टोबरनंतरची ही त्याची सगळ्यात खालची क्रमवारी आहे. नोव्हाक जोकोव्हिचला माद्रिदमध्ये दुसऱ्या फेरीत झालेल्या पराभवाची झळ बसली आहे. तर या स्पर्धेत जेतेपद पटकावणारा अले्नझँडर ज्वेरेवने तिसऱ्या स्थानी कायम आहे.
महिलांमध्ये रोमानियाची सिमॉन हेलेप अग्रस्थानावर असून त्यानंतर डेन्मार्कची कॅरोलीन व्होजनियाकी तर स्पेनची गार्बीन मुगुरुझा तृतीय स्थानावर आहे. माद्रिद मास्टर्समध्ये नदालला हरवणारा (आठवा क्रमांक) डॉमनिक थिमेम हा आपल्या स्थानावरुन एक क्रमांक खाली उतरला आहे. थिमेमला  दक्षिण अफ्रिकेचा केविन एंडरसनने हरवल्याने तो सातव्या क्रमांकावर आला आहे. या स्पर्धेत रँकिगचा फायदा डेनिस शापोवालोव याला झाला आहे. महिलांच्या माद्रिद ओपन्समध्ये विजय मिळवणारी पेट्रा क्वितोवाला दोन क्रमांकाचा फायदा होऊन ती आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे. अंतिम सामन्यात क्वितोवा सोबत हरल्यानंतर किकी बेर्टीसने रॅकिंगमध्ये पाचवा क्रमांकांची बढत मिळवून तिने १५ वा क्रमांक मिळवला आहे. रॅकिंगमध्ये रोमानियाची सिमोना हालेप, डेनमार्कची कॅरोलीन, स्पेनची गारबाइन या महिला खेळाडू अव्वल ठरले आहेत.
First Published on: May 17, 2018 12:16 PM
Exit mobile version