रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला १५ वर्ष पूर्ण; ‘खास’ पत्र शेअर करत घडवणाऱ्यांचे मानले आभार

रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला १५ वर्ष पूर्ण; ‘खास’ पत्र शेअर करत घडवणाऱ्यांचे मानले आभार

भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण करून १५ वर्षे पूर्ण झाली. आतंरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला १५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रोहित शर्माने सोशल मीडियावर (Social Media) एक पत्र (Letter) पोस्ट केले आहे. पदार्पणाच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रोहित शर्माने हे पत्र शेअर केले आहे. या पत्रात त्याने एक खेळाडू म्हणून मला घडवण्यात ज्यांचे योगदान आहेत, त्यांचे आभार मानले आहे. (Rohit Sharma Debut 15 Years Completed Share Emotional Letter)

रोहित शर्माने १५ वर्षू पूर्ण झाली. रोहित शर्मा याने २३ जून २००७ ला आयर्लंडविरूद्ध बेलफास्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आज या दिवसाच्या आठवणींना उजाळा देताने रोहितने एक पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले.

टीम इंडियाच्या जर्सीचा फोटो शेअर

रोहित शर्माने टीम इंडियाच्या जर्सीचा फोटो शेअर करत ट्विट केले की, “माझ्या आवडत्या जर्सीला १५ वर्षे पूर्ण झाले. मी त्या सर्वांचे आभार मानतो जे माझ्या या प्रवासात माझ्या बरोबर होते. ज्यांनी मला एक खेळाडू म्हणून तयार होताना मदत केली या सर्वांचे धन्यवाद. सर्व क्रिकेट प्रेमी, चाहते आणि टीकाकार तुमचे प्रेम आणि साथ याच्या जोरावरच मी अडचणींवर मात करू शकलो”, असे रोहित शर्माने आपल्या पत्रात लिहीले आहे.

हेही वाचा – मुंबईच्या रस्त्यावर रोहित शर्माचं गल्ली क्रिकेट, व्हिडिओ तुफान व्हायरल…

३५ वर्षीय रोहित शर्माने वनडे मालिकेत २३० सामन्यात २२३ डावात फलंदाजी करत ९ हजार २८३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४८.६० इतकी आहे. यामध्ये २९ शतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने आतापर्यंत १२५ टी २० सामने खेळले आहेत. यामध्ये ३ हजार ३१३ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे.

याशिवाय, कसोटीतील ४५ सामन्यात ७७ डावात ३ हजार १३७ धावा केल्या आहेत. त्याची कसोटीतील सरासरी ४६.१३ अशी आहे. यात ८ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.


हेही वाचा – मितालीनंतर आणखी एका महिला क्रिकेपटूकडून निवृत्तीची घोषणा

First Published on: June 23, 2022 7:08 PM
Exit mobile version