घरक्रीडामितालीनंतर आणखी एका महिला क्रिकेपटूकडून निवृत्तीची घोषणा

मितालीनंतर आणखी एका महिला क्रिकेपटूकडून निवृत्तीची घोषणा

Subscribe

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता रुमेली धरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रुमेलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले आहे. तिच्या या पोस्टमधून १५ वर्षांच्या क्रिकेट करिअरला अलविदा केले आहे. २००३ मध्ये इंग्लंडविरूद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. यावेळी धरने भारतासाठी चार कसोटी, ७८ एकदिवसीय आणि १८ टी-२० सामने खेळले आहेत.

पश्चिम बंगालमधून सुरू झालेला माझा २३ वर्षांचा क्रिकेट प्रवास अखेर संपला. मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणे आणि २००५च्या अंतिम फेरीत पोहोचणे माझ्यासाठी सर्वात संस्मरणीय होते, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती देताना इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rumeli Dhar (@rumelidhar54)

- Advertisement -

निवृत्तीच्या पोस्टमध्ये रुमेलीने म्हटलंय की, सर्व चढ-उतारात माझ्यासोबत राहिलेल्या प्रत्येकाचे आभार मानते ज्यांनी माझ्यावर आणि माझ्या खेळावर प्रेम केले, जेव्हा मला सर्वात जास्त गरज होती तेव्हा मला पाठबळ दिले, माझ्या सर्वात वाईट वेळी मला आनंद दिला, या सर्वांचे मी आभारी आहे.

- Advertisement -

२०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या तिरंगी टी-२० मालिकेत खेळला होता. रुमेलीने कसोटी क्रिकेटमध्ये २९.५० च्या सरासरीने २३६ धावा केल्या आणि २१.७५ च्या सरासरीने आठ विकेट घेतल्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १९.६१ च्या सरासरीने सहा अर्धशतकांसह ९६१ धावा केल्या आहेत.


हेही वाचा : आयसीसी एकदिवसीय महिला गोलंदाज क्रमवारी, टॉप ५ मधून झूलन गोस्वामी आउट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -