दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का, हिटमॅनच्या हाताला गंभीर दुखापत

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का, हिटमॅनच्या हाताला गंभीर दुखापत

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सर्वच भारतीय खेळाडू सराव करत आहेत. परंतु सरावादरम्यान हिटमॅन रोहित शर्माच्या हाताला लागलं असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. रविवारी मुंबईमध्ये जेव्हा टीम सराव करत होती. त्यावेळी रोहित शर्मा फलंदाजी करत होता. तेव्हा टीम इंडियामधील थ्रो-डाऊन अनुभवी बॉलर रघुच्या बॉलवर रोहित शर्मा खेळत होता. त्यावेळी रोहित शर्माच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापत होऊन सुद्धा तो फलंदाजी करत होता. मात्र काही क्षणानंतर तो फलंदाजी करू शकला नाही.

दक्षिण आफ्रिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अंजिक्य रहाणेच्या जागेवर रोहित शर्माला उपकर्णधार बनविण्यात आलं आहे. टीम इंडिया १६ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. मात्र, त्याआधी टीमला तीन ते चार दिवसांचं क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाचा पहिला सामना २६ डिसेंबर रोजी सेंचुरियनमध्ये खेळवला जाणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका

पहिला सामना – २६-३० डिसेंबर, सेंचुरियन
दुसरा सामना – ३-७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा सामना – ११-१५ जानेवारी, केपटाउन

दक्षिण आफ्रिकेसोबत टीम इंडियाचा पहिला सामना २६ डिसेंबर रोजी सेंचुरियनमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना ३ जानेवारी जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे. त्याचप्रकारे तिसऱ्या सामन्याला ११ जानेवारी रोजी केपटाउनमध्ये सुरूवात होणार आहे. असे एकूण तीन सामने दक्षिण आफ्रिकेविरूद्द खेळवण्यात येणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेचं डीन एल्गरकडे कर्णधारपद

दक्षिण आफ्रिका संघ टीम इंडियासोबत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या संघाने डीन एल्गरकडे कर्णधारपद सोपवलं आहे. तर टेम्बा बावुमा उपकर्णधार असणार आहे. यावेळी वेगवान गोलंदाज डुएन ओलिवियर बऱ्याच काळानंतर संघामध्ये पुन्हा एकदा नव्याने पुनरागमन करणार आहे.

असा असेल भारताचा संघ – 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, ऋध्दिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज

असा असेल दक्षिण आफ्रिकेचा संघ – 

डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), कगिसो रबाडा, सरेल एर्वी, ब्यूरेन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्करम, प्रेनेलॅन सुब्रायन, सिसांडा मगाला, रेयान रिकेल्टन, डुएन ओलिवियर, एनरिच नॉर्खिया, कीगन पीटरसन, रॅसी वॅन डर डूसन, वियान मल्डर,काइल वेरेने, मार्को जॅनसेन, ग्लेंटन स्टरमॅन.

First Published on: December 13, 2021 4:57 PM
Exit mobile version