नव्या विक्रमापासून रोहित शर्मा केवळ ३ षटकार दूर

नव्या विक्रमापासून रोहित शर्मा केवळ ३ षटकार दूर

नव्या विक्रमापासून रोहित शर्मा केवळ ३ षटकार दूर

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा टी २० क्रिकेटमध्ये ४०० षटकारचा नवा विक्रम करण्यापासून केवळ ३ षटकार दूर आहे. रोहित शर्माने टी २० क्रिकेटमध्ये ३ षटकार मारल्यास तो ४०० षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू बनू शकतो. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध रोहितने ३ षटके पटकावले तर त्याच्या नावे नव्या विक्रमाची नोंद होईल. रोहित शर्मा सध्याच्या यादीमध्ये ८ व्या स्थानावर असून प्रथम स्थानावर वेस्टइंडिजचा खेळाडू ख्रिस गेल आहे.

क्रिस गेलने आपल्या टी २० क्रिकेट कारकिर्दीमध्ये आश्चर्यकारक १०४२ षटकार मारले आहेत. वेस्ट इंडिजचा सध्याचा मर्यादित षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्ड ७५६ षटकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आंद्रे रसेल ५०९ षटकार, ब्रेंडन मॅक्कुलम ४८५ षटकार, शेन वॉटसन ४६७ षटकार, एबी डिव्हिलियर्स ४३० षटकार आणि आरोन फिंच ३९९ षटकारंसह रोहित शर्माच्या पुढे आहेत.

भारतीय संघात रोहित शर्मा शिवाय कोणताही फलंदाज ३५० षटकार मारण्यामध्ये यशस्वी झाला नाही. चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैना ३२४ षटकारांसह रोहित शर्मानंतर दुसरा भारतीय खेळाडू आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे ३१५ षटकार आहेत तर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीच्या नावे ३०३ षटकार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये ५ वेळा चॅम्पियन आहेत.

रोहित पवारने मुंबई ईंडियन्सकडून पावरप्लेमध्ये ४८ षटकार लगावले असून आणखी २ षटकार लगावल्यास ५० षटके पुर्ण होतील. तसेच केकेआरविरुद्ध रोहित शर्माने ९६ चौकार झाले असून ६ चौकार केल्यास चौकारांचे शतक पुर्ण होईल. तसेच रोहितचा लवकरच ५५०० धावांचा आकडा पुर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडिन्सच्या रोहित शर्माने २०७ आयपीएल सामन्यात ५४८० धावा केल्या आहेत. विराट कोहली ६०८१ धावांनी पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज शिखर धवनने ५६१९ धावा केल्या आहेत. तिसऱ्या नंबरवर चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना असून त्याच्या नावे ५४९५ धावा केल्या आहेत. आता रोहित शर्माकडे रैनाला पिछाडीवर सोडण्याची संधी आहे.


हेही वाचा : IPL 2021 SRH vs DC : नॉर्टजेची ताशी १५१.७१ किमी वेगाने गोलंदाजी, ८ वेगवान चेंडूंचा विक्रम


 

First Published on: September 23, 2021 6:22 PM
Exit mobile version