हिटमॅनचा भाव वधारला

हिटमॅनचा भाव वधारला

रोहित शर्मा, क्रिकेटपटू

खेळाडू उत्तम असला की त्याचा एक ब्रँड होतो आणि त्याचा भाव देखील वधारतो. भारतीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, एम.एस.धोनी, विराट कोहली आदी खेळाडूंना अशी कामगिरी करता आली. भारतीय क्रिकेटमध्ये असाच एक नवा ब्रँड तयार झाला आहे.

असाच एक असलेल्या भारतीय संघाचा सर्वात आक्रमक ओपनर अशी ओळख असलेल्या रोहित शर्माचा भाव देखील वधारला आहे. अनेक कंपन्यांनी रोहितमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. भारतीय संघाच्या या सलामीवीराकडे सध्या 20 हून अधिक ब्रँड आहेत. यामध्ये सीएट टायर्स, आदिदास, हब्लोट वॉचेस, रेलिस्प्रे, रसना, शार्प इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्रीम 11 आदींचा समावेश आहे.

रोहितची अधिकृत ब्रँड व्हॅल्यू किती आहे याचा खुलासा झाला नसला तरी कॉर्पोरेट क्षेत्रामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितच्या कमाईमध्ये वर्षाला 75 कोटींची वाढ झाली आहे. रोहित सध्या प्रत्येक ब्रँडकडून एका दिवसासाठी एक कोटी रुपये घेतो. यामध्ये टिव्ही, वृत्तपत्र, डिजिटल आणि इव्हेंटचा समावेश असतो.

इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत रोहितने 5 शतक झळकावले होते. एका वर्ल्डकप स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. रोहितच्या या कामगिरीमुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढली आहे.

First Published on: December 1, 2019 5:33 AM
Exit mobile version