रोनाल्डोला रेड कार्ड पण ज्युव्हेंटस विजयी

रोनाल्डोला रेड कार्ड पण ज्युव्हेंटस विजयी

रोनाल्डोला रेड कार्ड (सौ-Evening Standard)

इटालियन संघ ज्युव्हेंटस गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात मानाची स्पर्धा युएफा चॅम्पिअन्स लीगच्या अंतिम सामान्यांपर्यंत पोहोचत होता. पण त्यांना ही स्पर्धा जिंकण्यात यश आले नाही. त्यामुळे त्यांनी ही स्पर्धा जिंकण्यासाठी पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलर क्रिस्तिआनो रोनाल्डोला रियाल मॅड्रिड संघाकडून आपल्या संघात घेतले. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी ज्युव्हेंटसने १०० मिलियन युरो इतकी किंमत मोजली. पण त्याची चॅम्पिअन्स लीगला अपेक्षेप्रमाणे सुरूवात झाली नाही.

२९ व्या मिनिटाला रेड कार्ड 

रोनाल्डो ज्युव्हेंटसकडून चॅम्पिअन्स लीगचा पहिलाच सामना खेळत होता. या सामन्याच्या २९ व्या मिनिटाला रोनाल्डोने वेलंसियाचा खेळाडू जेईसन मुरिलो याला लाथ मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर रोनाल्डोने त्याच्या डोक्यावर हात लावला. हे कृत्य जर्मन रेफ्री फेलिक्स ब्रीच यांना न आवडल्याने त्यांनी रोनाल्डोला रेड कार्ड दिले. त्यामुळे रोनाल्डो उर्वरित सामन्यात खेळू शकला नाही. तसेच रेड कार्ड मिळाल्याने त्याच्यावर तीन सामन्यांची बंदी आली आहे.

रोनाल्डोशिवायही ज्युव्हेंटस विजयी

रोनाल्डोला रेड कार्ड मिळाले तरी ज्युव्हेंटसने वेलंसियाचा २-० असा सहज पराभव केला. या सामन्यात ज्युव्हेंटसला ४५ आणि ५१ व्या मिनिटाला दोन पेनल्टी मिळाल्या. या पेनल्टीवर मीरेलाम पॅजनिकने गोल करत ज्युव्हेंटसला विजय मिळवून दिला.
First Published on: September 20, 2018 5:39 PM
Exit mobile version