IPL 2020 : CSK च्या अडचणी कायम; ऋतुराज गायकवाड अजुनही कोरोना पॉझिटिव्ह

IPL 2020 : CSK च्या अडचणी कायम; ऋतुराज गायकवाड अजुनही कोरोना पॉझिटिव्ह

आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु व्हायला २ दोन दिवस असताना चेन्नईच्या अडचणी अद्याप कमी झालेल्या नाहीत. चेन्नई संघातील कोरोनाची लागण झालेल्या ऋतुराज गायकवाडचा अहवाल अजुन निगेटीव्ह आलेला नसल्यामुळे तो अद्याप क्वारंटाइनमध्ये आहे. यामुळे चेन्नई आणि धोनी समोरच्या अडचणी कमी होत नाही आहेत. ऋतुराज गायकवाडला दीपक चहर व सपोर्ट स्टाफमधील १२ यांच्यासोबत कोरोनाची लागण झाली होती. मात्र इतरांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या सर्वांनी करोनावर यशस्वीरित्या मात करत पुन्हा एकदा संघासोबत Bio Secure Bubble मध्ये प्रवेश मिळवला आहे.

मात्र, गेले दोन आठवडे क्वारंटाईन असलेल्या ऋतुराजचा कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप निगेटिव्ह आलेला नाही. ऋतुराजला कोणतीही कोरोनाची लक्षणं नाही आहेत. डॉक्टरांचं पथक त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. लवकरच ऋतुराजचा अहवाल निगेटिव्ह येईल अशी आशा CSK ला आहे. सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडला तिसऱ्या स्थानावर खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतू अद्याप कोरोना अहवाल निगेटीव्ह आलेला नसल्यामुळे ऋतुराज सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. चेन्नईची येत्या १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स सोबत सलामीची लढत आहे.

 

First Published on: September 16, 2020 1:29 PM
Exit mobile version