स्मृती मंधानाने इतिहास रचला, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू

स्मृती मंधानाने इतिहास रचला, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना डीव्हाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवायचा होता. या सामन्याची हीरो सलामीवीर स्मृती मंधाना ठरली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500हून अधिक धावा करणारी स्मृती मंधाना ही दुसरी महिला खेळाडू ठरली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात स्मृती मंधानाची जोरदार खेळी झाली. संघासाठी डावाची सुरुवात करताना तिने 49 चेंडूत 161.22च्या स्ट्राईक रेटने 79 धावांची खेळी केली. यादरम्यान तिच्या बॅटमधून 9 चौकार आणि 9 षटकार निघाले.

प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 188 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारताने 20 षट्कात ऑस्ट्रेलियाच्या इतकेच म्हणजे 187 धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी 5 धावांची गरज असताना ऋचा घोषने चौकार मारला आणि धावसंख्या समान झाले.

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 11 अर्धशतकं ठोकली आहेत. महिलांच्या क्रिकेटमध्ये स्मृतीने वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरला मागे टाकले आहे. स्मृतीचे T20 क्रिकेटमधील हे 12 वे अर्धशतक ठरले. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणारी ती क्रिकेटपटू ठरली आहे.


हेही वाचा : पहिल्याच सुपर ओव्हरमध्ये भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय; ऑस्ट्रेलियाचा केला पराभव


 

First Published on: December 12, 2022 6:59 PM
Exit mobile version