मराठमोळी स्म्रिती मानधना आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल

मराठमोळी स्म्रिती मानधना आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल

स्म्रिती मानधना

मराठमोळ्या स्म्रिती मानधनाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीच्या महिला एकदिवसीय फलंदाजी कर्मवारीत स्म्रिती मानधना अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. आयसीसीने शनिवारी क्रमवारी जाहीर केली. स्म्रितीने न्यूझीलंडविरोधात तीन एकदविसीय सामन्यात दमदार फलंदाजी करत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. न्यूझीलंडविरोधातील दमदार फलंदाजीच्या जोरावर तिने ऑस्ट्रलियाच्या एलिस पॅरी आणि मेग रॅनिंग्जला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

मानधना गतवर्षापासून चांगल्या लयीत आहे. २०१८ मध्ये तिने दोन शतकांसह आठ अर्धशतके झळकावली आहेत. भारताविरोधात उत्कृष्ट प्रदर्शन करणारी न्यूझीलंड संघाची कर्णधार एमी सॅटरवेटला दहा अंकाचा फायदा झाला आहे. एमी चौथ्या स्थानावर पोहचली आहे.

भारताची कर्णधार मितालीला एक क्रमचा फटका बसला आहे. मिताली चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरली आहे. भारतीय महिला संघाने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेली एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. पण पहिल्या दोन सामन्यांतील विजयाच्या जोरावर भारताने मालिका खिशात घातली. २८ धावांत ४ बळी टिपणार्‍या अना पीटरसन हिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर मराठमोळी मानधाना ‘मालिकावीर’ ठरली.

First Published on: February 3, 2019 4:30 AM
Exit mobile version